भारतीय संघाचा माजी विश्वविजेचा कर्णधार एमएस धोनी हा नेहमीच निराळ्या गोष्टी करण्यात प्रसिद्ध आहे. मैदानावर विरोधी संघाला निर्णयक्षमतेच्या जोरावर कोंडीत पाडण्यात हुशार असणाऱ्या या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर शेती करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. तो त्याने अंमलातही आणत सेंद्रीय शेती केली आणि त्याच्या भाज्यांना बाहेरील देशातून मागणीही आली.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामानंतर धोनी आता पुन्हा आपल्या वेगळ्या कामाकडे वळला आहे. यावेळी त्याने चेन्नईच्या गरूड एरोस्पेस कंपनीचे शेयर विकत घेतले असून तो या कंपनीचा ब्रॅंड अम्बेसेडरही असणार आहे. ही कंपनी शेतीसाठी लागणारे यंत्र बनवून शेतकऱ्यांची कामे कमी करते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी किटकनाशक, खत आणि पाणी फवारण्यासाठी ड्रोन बनवले जातात, यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे. तर आता धोनीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे काम सोपे होणार आहे.
“मी या कंपनीचा एक भाग झालो याचा मला आनंद आहे. या कंपनीचे यश पाहण्यास आतूर असून ही कंपनी शेतकऱ्यांची मदत करणार आहे,” असे धोनीने म्हटले आहे. त्याने या कंपनीत किती गुंतवणुक केली आहे हे स्पष्ट झाले नाही.
गरुड एयरस्पेस कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अग्नीश्वर जयप्रकाशन हे धोनीचा कंपनीत समावेश झाला याबद्दल आनंदित आहे. “मी धोनीचा चाहता आहे. त्याने कंपनीच्या कामाचा आलेख पाहिला आहे. ‘कॅप्टन कूल’ आमच्या संघात आल्याने सहकाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे,” असे जयप्रकाशन म्हणाले आहेत.
The Helicopter has arrived 🚁
Captain Cool #MSDhoni makes a strategic investment in India's Largest Drone Startup – Garuda Aerospace.
We can’t keep quite 😍@AgnishwarJ pic.twitter.com/qxMBGJZkQf
— Garuda Aerospace Pvt Ltd (@garuda_india) June 6, 2022
या कंपनीने कोरोनाच्या काळात वाराणसी, चेन्नई, रायपूर आणि हैद्राबाद या शहरांमध्ये औषधी पोहोचवण्याची कामे देखील केली आहेत. २०१५मध्ये सुरू झालेल्या या कंपनीच्या ड्रोन सुविधेचे नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकार्पण करण्यात आले आहे.
सध्या ही कंपनी २६ शहरांमध्ये ३०० ड्रोन आणि ५०० पायलट्सच्या मदतीने सेवा पुरवत आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंस्टाग्रामचा कोहलीच ‘किंग’! विराट मोठ्या उपलब्धीच्या नजीक, बनणार जगातील एकमेव क्रिकेटर
बाबो ! रुटची बॅटपण राहते “स्वत:च्या पायावर उभी,” पाहा व्हिडिओ
हे भारीये! जेव्हा नदालने जिंकलेले पहिले फ्रेंच ओपन, तेव्हा आजचा उपविजेता होता केवळ ‘इतक्या’ वर्षांचा