शुक्रवारी (२५ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आपीएलच्या तेराव्या हंगामातील ७वा सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने चेन्नईला ४४ धावांनी पराभूत केले. चेन्नईच्या या सलग दूसऱ्या पराभवानंतर चाहत्यांना सुरेश रैनाची आठवण येत आहे.
अनेक चाहते तर सोशल मीडियावर चेन्नई संघाला रैनाला भारतातून युएईला परत बोलवण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे ट्विटरवर रैनाच्या चाहत्यांनी ‘कमबॅक मिस्टर आयपीएल’ (परत ये मिस्टर आयपीएल) हे हॅशटॅग ट्रेंड करायला सुरुवात केली आहे. अशात चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी रैनाच्या पुनरागमनाविषयी वक्तव्य केले आहे. Chennai Super Kings CEO Talked About Suresh Raina Comeback
एएनआयला बोलताना विश्वनाथन म्हणाले की, “आयपीएलपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय हा रैनाचा वैयक्तिक निर्णय होता. त्याला परत बोलवण्याचा विचार फ्रंचायझी करत नाही. त्याने स्वत: आयपीएलमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो.”
“आमचा संघ या स्पर्धेत शानदार पुनरागमन करेल. आमच्या संघात दमदार खेळाडू आहेत, जे येत्या सामन्यांमध्ये कमालीचे प्रदर्शन करतील. आमच्या संघाला मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोविंग लाभली आहे. मी त्या सर्व चाहत्यांना विश्वासाने सांगू इच्छितो की, या स्पर्धेत चेन्नई संघ दमदार पुनरागमन करेल. हा खेळ आहे, ज्यामध्ये कधी चांगले तर कधी वाईट दिवस येतात,” असे पुढे बोलताना विश्वनाथन म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
हाच होणार सचिन तेंडुलकरचा जावई? पाहा कोणासोबत जोडलं जातंय साराचं नाव
न्यूझीलंड क्रिकेट संघाला ‘या’ कारणासाठी सरकारकडून मिळाला हिरवा कंदील
पंजाबचा फिरकीपटू रवी बिष्णोईने स्टिव्ह स्मिथला दिला ‘हा’ इशारा
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटच्या ग्राउंडचा राजनयात उपयोग करणारे मनमोहन सिंग तुम्हाला माहित आहेत का?
लालचंद राजपूत यांना पाकिस्तानी व्हिसा मिळावा यासाठी झिम्बाब्वेचे प्रयत्न, ‘हे’ आहे कारण
आयपीएलमध्ये शेवटच्या २ षटकात गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारे ३ फलंदाज