Chennai Super Kings full schedule for IPL 2025- आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. चेन्नई सुपर किंग्ज 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सीएसके त्यांच्या पहिल्या चारपैकी तीन सामने घरच्या मैदानावर खेळत असल्याने, त्यांना सुरुवातीपासूनच स्पर्धेत वर्चस्व गाजवण्याची संधी असेल. गेल्या हंगामात, सीएसके लीग टप्प्यातूनच बाहेर पडले होते. नॉकआउट सामन्यांसाठी संघ टॉप-4 मध्ये स्थान मिळवू शकला नाही.
आयपीएल 2025 मधील चेन्नईचे सामने
23 मार्च, सीएसके विरुद्ध एमआय, चेन्नई
28 मार्च, सीएसके विरुद्ध आरसीबी, चेन्नई
30 मार्च, आरआर विरुद्ध सीएसके, गुवाहाटी
5 एप्रिल, सीएसके विरुद्ध डीसी, चेन्नई
8 एप्रिल, पीबीकेएस विरुद्ध सीएसके, मुल्लानपूर
11 एप्रिल, सीएसके विरुद्ध केकेआर, चेन्नई
14 एप्रिल, एलएसजी विरुद्ध सीएसके, लखनऊ
20 एप्रिल, एमआय विरुद्ध सीएसके, मुंबई
25 एप्रिल, चेन्नईमध्ये सीएसके विरुद्ध एसआरएच
30 एप्रिल, सीएसके विरुद्ध पीबीकेएस, चेन्नई
3 मे, आरसीबी विरुद्ध सीएसके, बंगळुरू
7 मे, केकेआर विरुद्ध सीएसके, कोलकाता
12 मे, सीएसके विरुद्ध आरआर, चेन्नई
18 मे, जीटी विरुद्ध सीएसके, अहमदाबाद
यंदाच्या स्पर्धेची सुरुवात 22 मार्च 2025 रोजी होणार असून, अंतिम सामना 25 मे 2025 रोजी खेळवला जाईल. एकूण 10 संघ सहभागी होणार असून, 13 वेगवेगळ्या ठिकाणी 74 सामने खेळवले जातील. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील पहिला सामना 23 मार्च 2025 रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर होईल.
हेही वाचा-
दुबईत उतरताच भारतीय संघ मैदानात, पहिल्या सराव सत्रात जोश भरला!
17 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती, आयपीएलमधील दोन दिग्गज भिडणार!






