शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० च्या ४१ च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला १० विकेट्सने पराभूत केले. हा चेन्नईचा ८ वा पराभव होता. या सामन्यानंतर चेन्नई संघावर मोठ्या प्रमाणात टिका झाली.
या सामन्यात चेन्नईची फलंदाजी मुंबईच्या गोलंदाजी आक्रमणासमोर पुर्णपणे निष्प्रभ ठरली. केवळ सॅम करनने चेन्नईकडून एकाकी झुंज दिली. चेन्नईने ४३ धावांवरच ७ विकेट्स गमावल्या होत्या. अशा स्थितीत सॅम करनने चेन्नईचा डाव सांभाळताना इम्रान ताहिरबरोबर ९ व्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे चेन्नईने २० षटकात सन्मानजनक ११४ धावसंख्या उभारली.
करनने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. तर ताहिरने नाबाद १३ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त शार्दुल ठाकूर(११) आणि एमएस धोनी(१६) यांनाच वैयक्तिक दोन आकडी धावसंख्या पार करता आली. अन्य फलंदाज १० धावाही प्रत्येकी करु शकले नाहीत.
मुंबईच्या ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने चेन्नईला सुरुवातीच्या षटकांमध्येच मोठे धक्के दिले. त्यांना राहुल चाहरने योग्य साथ दिली. बोल्टने ४ विकेट्स घेतल्या, तर बुमराह आणि चाहरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन कुल्टर-नाईलने १ विकेट घेतली.
त्यानंतर ११५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून इशान किशनने नाबाद ६८ आणि क्विंटॉन डिकॉकने नाबाद ४६ धावा केल्या. त्यांच्या नाबाद भागीदारीमुळे मुंबईने १३ व्या षटकातच ११५ धावांचे आव्हान गाठले आणि सामना १० विकेट्सने जिंकला.
चेन्नई आयपीएलमध्ये पहिल्यांदाच १० विकेट्सने पराभूत झाले आहेत. तसेच हंगामातील साखळी फेरीत ८ सामने गमावण्याची चेन्नईची ही पहिलीच वेळ आहे.
गाडी क्रमांक १५५२ वरुन चेन्नई सुपर किंग्स ट्रोल
या सामन्यानंतर चेन्नई संघावर अनेक मीम्स व्हायरस झाले आहेत. यादरम्यान काही चाहत्यांनी गाडी क्रमांक १५५२ वरुन चेन्नईला ट्रोल केले आहे. यामागे कारण असे की सोलापूर, कोल्हापूर, सांगोला आणि मिरज या मार्गाने जाणाऱ्या बसचा हा क्रमांक आहे आणि आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु होण्याआधी कोल्हापूरमध्ये चेन्नई आणि मुंबई संघांच्या फॅन्समध्ये वाद झाले होते. तसेच त्यांनी एकमेकांविरुद्ध पोस्टरही लावले होते, ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.
https://twitter.com/AdiKandreSpeaks/status/1319878160947630080
https://twitter.com/shivare_v/status/1319653574037495808
https://twitter.com/iRavi_Inamdar/status/1319684488780275712
https://twitter.com/aquarianhead/status/1319900948492292096
चेन्नईच्या पराभवानंतर अन्यही काही मीम्स व्हायरल झाले, त्यातील हे काही निवडक मीम्स
https://twitter.com/karwaan123/status/1319653103319150593
https://twitter.com/pra_tea_k/status/1319659038934614017
https://twitter.com/MIFansClubTN/status/1319648238752784384
https://twitter.com/meme__verse/status/1319645013513437184
https://twitter.com/AmitHellboyz143/status/1319652645091459074
CSK players going to hotel with Sam Curran#CSKvMI pic.twitter.com/kTWnWOEQEU
— Kung fu Pandya (@Kiranpa60053073) October 23, 2020
https://twitter.com/_Athreyadaw_3/status/1319698169148604419
या पराभवामुळे चेन्नईच्या प्ले ऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. चेन्नईचे आता साखळी फेरीतील ३ सामने राहिले आहेत. चेन्नईचा पुढील सामना रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गब्बरच्या फर्स्ट क्लास फलंदाजीमागचे रहस्य नक्की काय?, स्वत: धवननेच केला खुलासा
सीएसकेला आता चमत्काराची गरज, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी करावं लागणार ‘हे’ काम
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला





