आयपीएलचा चौदावा हंगाम एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच आयपीएलच्या बातम्यांनी क्रीडाक्षेत्र व्यापून टाकले आहे. १८ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव पार पडल्यानंतर सर्व संघांची तयारी जोमाने सुरू होईल. तत्पूर्वी, आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला नवा प्रायोजक मिळाल्याची बातमीसमोर येत आहे. सीएसके व्यवस्थापनाकडून मात्र याबाबतची अधिकृत घोषणा झाली नाही
स्कोडाने केला ७५ कोटींचा करार
एका अग्रगण्य क्रीडासंकेतस्थळाने दिलेल्या बातमीच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, ‘चेक रिपब्लिकची मोटार कंपनी स्कोडाने चेन्नई सुपर किंग्ससोबत मुख्य प्रायोजक म्हणून करार केला आहे. ७५ कोटींचा हा करार पुढील तीन वर्षांसाठी असेल.’
चेन्नई सुपर किंग्जने २०१८ ते २०२० या तीन वर्षाच्या कालावधीसाठी ‘मुथूट फायनान्स’ या कंपनीशी ६५ कोटींचा करार केला होता. मुथूट फायनान्सने आपला करार पुढे वाढविण्यास नकार कळविल्याने चेन्नई सुपर किंग्सला मुख्य प्रायोजक हवा होता. मात्र, अद्याप सीएसके व्यवस्थापनाने या कराराबाबतची अधिकृत घोषणा केली नाही.
मागील हंगामात चेन्नईची निराशाजनक कामगिरी
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघासाठी २०२० आयपीएल हंगाम निराशाजनक राहिला होता. स्पर्धेच्या इतिहासात चेन्नई संघ प्रथमच प्ले ऑफसाठी पात्र ठरला नव्हता. त्यामुळे, कर्णधार व संघावर टीका झाली होती. तीन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवणारा सीएसके संघ गत हंगामात सातव्या स्थानी घसरला होता. पुढील हंगामात चेन्नईच्या चाहत्यांना संघाकडून अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या:
कदाचित भारत ३-० किंवा ४-० फरकाने इंग्लंडला पराभूत करेल, इंग्लंडच्या दिग्गजाची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय! पाहा कोणी केलंय कौतुक
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ