इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत आज (२८ एप्रिल) दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आपल्या जुन्या फॉर्ममध्ये येताना दिसून येत आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाला अजूनही साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे.
या सामन्यात विजय मिळवत धोनीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाला गुणतालिकेत पुन्हा एकदा पहिल्या स्थानी पोहचवण्याची संधी असणार आहे. तर डेविड वॉर्नरकडे आपला लुजरचा टॅग हटवण्याची संधी असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या ८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. जर त्यांना आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले, तर १० गुण होऊन चेन्नई सुपर किंग्ज संघ पहिल्यास्थानी येऊ शकतो. दुसरीकडे डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यात अवघ्या एकाच सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे २ गुणांसह सनरायझर्स हैदराबाद संघ ८ व्या क्रमांकावर आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहता या सामन्यात ते विजयाचा प्रबळ दावेदार असणार आहेत. परंतु काही दिवसांपुर्वी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात देखील चुरशीची लढत पाहायला मिळाली होती.
सुपर ओव्हर सामन्यात दिल्लीने हैदराबादचा केला होता पराभव
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्याचा समारोप सुपर ओव्हरने झाला होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला देखील १५९ धावा करण्यात यश आले होते.
त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या डेविड वॉर्नर आणि केन विलीयमसन यांनी ७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली संघाकडून स्वतः कर्णधार रिषभ पंत आणि शिखर धवन यांची जोडी मैदानात आली होती. या दोघांनी दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला होता.
चेन्नईने बेंगलोरवर मिळवला होता एकहाती विजय
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने १९१ धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये फाफ डू प्लेसीने ५० धावा आणि रवींद्र जडेजाने तुफान फटकेबाजी करत नाबाद ६२ धावांची खेळी केली होती. चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिलेल्या १९२ धावांचा पाठलाग करताना देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली होती. संघातील इतर फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६९ धावांनी आपल्या नावावर केला होता.
दिल्लीच्या खेळपट्टीवर दोन्ही संघांचा दबदबा
दिल्लीच्या खेळपट्टीवरील चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादची आकडेवारी चांगली राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्ज या मैदानावर ८ सामने खेळले असून आठही सामन्यात विजयी पताका झळकावली आहे. तर सनरायझर्स हैदराबादने ६ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले आहेत. परंतु यावेळी चेन्नई सुपर किंग्जचे पारडे अधिक जड आहे.
चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेवन
ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, एमएम धौनी (कर्णधार), सॅम करन, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर आणि इमरान ताहिर
सनराइजर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेवन
डेविड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरेस्टो, केन विलियम्सन, मनीष पांडे, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, जगदीश सुचिथ, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौल
महत्त्वाच्या बातम्या-
‘दहा लाखांचा नाही करोडोंचा खेळाडू बनून दाखव’; …अन् दिल्लीच्या शिलेदाराने गुरू द्रविडचे शब्द खरे केले
धोनीची चेन्नई ठरणार ‘सुपर’ की हैदराबादचा होणार ‘सनराईज’, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
आयपीएलमधून माघार घेतलेल्या झम्पाचे धक्कादायक वक्तव्य; म्हणे, ‘भारतातील वातावरण सुरक्षित वाटत नव्हतं’




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा