रविवारी (दि. 30 एप्रिल) क्रिकेटप्रेमींना डबल हेडर सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. कारण, या दिवशी दोन सामने खेळले जाणार आहेत. यातील आयपीएल 2023चा 41वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. तसेच, आयपीएल 2023चा 42वा सामना मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स संघात 7.30 वाजता खेळला जाणार आहे. यातील 41व्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेतील स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असेल.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअम (MA Chidambaram Stadium) येथील या सामन्यात पंजाब किंग्स संघात एक बदल आहे. तो बदल म्हणजेच हरप्रीत सिंग भाटिया याला ताफ्यात सामील करण्यात आले आहे.
🚨 Toss Update 🚨@ChennaiIPL win the toss and elect to bat first against @PunjabKingsIPL
Follow the match ▶️ https://t.co/FS5brqfoVq#TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/cnA72rMGhg
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
स्पर्धेतील कामगिरी
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने या सामन्यापूर्वी 8 सामने खेळले आहेत. त्यातील 8पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 3 सामन्यात त्याना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने 8 सामने खेळले असून त्यातील 4 सामन्यात विजय, तर 4 सामन्यात पराभव मिळाला आहे. हा सामना जिंकून स्पर्धेत चांगल्या स्थितीत पोहोचण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. (Chennai Super Kings have won the toss and have opted to bat against Punjab Kings ipl 2023)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), मथीशा पथीराना, तुषार देशपांडे, महीश थीक्षणा
पंजाब किंग्स
अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, सिकंदर रझा, सॅम करन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, हरप्रीत सिंग भाटिया, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चहल दारुच्या नशेत? नीट चालताही येत नसल्याने घेतला व्यक्तीचा आधार, व्हिडिओ तुफान व्हायरल
पाकिस्तान सुधरणार नाही! लाईव्ह सामन्यात घडली मोठी चूक, अंपायर्सनी लगेच थांबवली मॅच; पाहा व्हिडिओ