---Advertisement---

मुंबई वि. चेन्नई : धोनीने पहिली बाजी जिंकली, नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन

On: शनिवार, एप्रिल 8, 2023 7:04 PM
MS-Dhoni-And-Rohit-Sharma
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी (दि. 8 एप्रिल) डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जात आहे, तर दुसरा सामना 7.30 वाजता वानखेडे स्टेडिअम येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी 7 वाजता उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक चेन्नई संघाने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विजय मिळवून मुंबई संघ स्पर्धेत विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न करेल, तर चेन्नई संघ दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

महत्त्वाचे बदल
दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत. चेन्नई संघाचे बेन स्टोक्स आणि मोईन अली हे या सामन्यातून बाहेर आहेत. तसेच, त्यांच्या जागी अजिंक्य रहाणे आणि ड्वेन प्रिटोरियस या खेळाडूंना संधी मिळाली आहे. दुसरीकडे, मुंबई संघाकडून जोफ्रा आर्चर खेळणार नाहीये.

दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी
या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने दोन सामने खेळले आहेत. यातील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात चेन्नईने लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध 12 धावांनी विजय मिळवला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. त्यातही त्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 8 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. (Chennai Super Kings have won the toss and have opted to field Against Mumbai Indians In IPL 2023 12th Match)

ही बातमी अपडेट होत आहे

उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, ऋतिक शोकीन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

चेन्नई सुपर किंग्स
डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चाहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचा जादू बनतोय बटलर! दिवसाच्या सामन्यांमध्ये उभारतोय धावांचा डोंगर, पाहा जबरदस्त आकडेवारी
सूर्या ते ऋतुराज, MI vs CSK सामन्यात ‘या’ 5 खेळाडूंवर असेल क्रिकेटविश्वाची नजर, पाहा यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---