---Advertisement---

रविंद्र जडेजा आयपीएलमध्ये खेळणार की नाही? सीएसकेकडून आले ‘असे’ उत्तर

On: गुरूवार, मार्च 25, 2021 10:14 PM
Ravindra-Jadeja
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. परंतु, हा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. टीम मॅनेजमेंटकडून मिळालेल्या माहितीनुसार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या तंदुरुस्तीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे तो संघात कधी सामील होणार हे अजूनही सीएसकेला माहिती नाही.

सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केसी विश्वनाथन याबद्दल म्हणाले की, जडेजा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. त्याशिवाय आमच्याकडे काही माहिती नाही. ते म्हणाले की, “जडेजा केव्हा संघात सामील होईल, हे आम्ही अद्याप काही सांगू शकत नाही. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत असून तिथे तो आपल्या तंदुरुस्तीवर काम करत आहे.”

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनी कसोटीत रविंद्र जडेजाच्या हाताच्या अंगठ्या दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि मर्यादित षटकांच्या मालिकेतही भाग घेऊ शकला नव्हता. काही दिवसांपूर्वी जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने पुन्हा फलंदाजी करताना त्याला आनंद होत आहे असे त्याने लिहले होते.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, जडेजा लवकरच सीएसकेमध्ये सामील होण्यार असल्याचे सांगितले जात होते. अष्टपैलू खेळाडू म्हणून सीएसकेसाठी तो खूप महत्वाचा ठरणार आहे. परंतु सीएसकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेेल्या विधानानुसार तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘इंडिया का अपना मंत्रा’ आयपीएल २०२१ चे नवे अँथम साँग रिलीज; व्हिडिओ पाहून म्हणाल क्या बात!

ब्रेकिंग! इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची उर्वरित वनडे मालिकेतून माघार, ‘या’ खेळाडूच्या हाती नेतृत्त्वपद

INDvENG: भारताला विजयी आघाडी घेण्याची संधी, तर इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, दुसऱ्या वनडेबद्दल जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---