सध्या आयपीएल 2025 च्या ऑक्शनबाबत अनेक बातम्या येत आहेत. मेगा लिलाव पूर्वी किती खेळाडू रिटेन करता येणार, यावर संघमालकांची बीसीसीआयशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता महिला प्रीमियर लीगबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
वास्तविक, 5 वेळची आयपीएल चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्जनं महिला प्रीमियर लीगमध्ये शामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, सीएसकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की, त्यांची फ्रेंचाईजी महिला प्रीमियर लीगबाबत विचार करत आहे. याशिवाय टीम निर्णय घेण्यापूर्वी महिला प्रीमियर लीगमधील अन्य 5 फ्रेंचायजींचा अनुभवही जाणून घेणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांची मुलगी रुपा गुरुनाथ फ्रेंचाईजी बोर्डात शामील होण्यासाठी तयार आहे. ती भविष्यातील टीमशी निगडीत सर्व गोष्टींचा अभ्यास करेल. या सर्व गोष्टींमध्ये शाळेतील मुलांसाठी जास्तीत जास्त कोचिंग सेंटर, चाहत्यांना जोडण्यासाठी नवे मार्ग आणि स्पॉन्सरशिप आणि मर्चेंडाईज मध्ये वाढ अशा मुद्द्यांचा समावेश आहे.
महिला प्रीमियर लीगचे पहिले 2 हंगाम यशस्वी राहिले होते. पहिला हंगाम मुंबई इंडियन्सनं जिंकला होता. तर दुसऱ्या हंगामात रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं विजेतेपद पटकावलं होतं. या दोन्ही हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा अंतिम सामन्यात पराभव झाला होता. याशिवाय यूपी वॉरिअर्स आणि गुजरात जायंट्स हे स्पर्धेतील अन्य दोन संघ आहेत. महिला प्रीमियर लीगच्या पुढील हंगामातही 5 संघ असतील, मात्र त्यानंतर स्पर्धेत नव्या संघांचा समावेश होऊ शकतो.
हेही वाचा –
सरफराज खानकडे मुंबई क्रिकेट संघाचं नेतृत्व, एमसीएनं दिली मोठी जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही तर? आयसीसीचा ‘प्लॅन बी’ तयार
भारतीय क्रिकेटपटूंना लवकरच मिळणार मोठे गिफ्ट, बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा