भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा मागच्या काही वर्षांपासून आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत आला आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याला सीएसकेचा कर्णधारही बनवले गेले होते, पण कर्णधारपदाचा भार त्याला पेलता आला नाही. जडेजाने आता अचानकपणे त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून सीएसके फ्रँचायझीशी संबंधीत सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत आणि त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. जडेजा आणि सीएसके यांच्यातील संबंधांवर फ्रँचायझीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महत्वाची माहिती दिली आहे.
दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून सीएसके फ्रँचायझीशी संबंधित सर्व पोस्ट डिलिट केल्यानंतर चर्चा होत आहे की, जडेजा आणि सीएसके यांच्यात काहीतरी बिनसले आहे. याविषयी सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, “हा जडेजाने घेतलेला वैयक्तिक निर्णय आहे. सर्वकाही ठीक आहे आणि जडेजासोबत फ्रँचायझीचे संबंध खूप चांगले आहेत.”
दरम्यान, मागच्या वर्षी आयपीएल हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी एमएस धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आणि जडेजाला संघाचा नवीन कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले होते. जडेजाने हंगामातील पहिल्या आठ सामन्यांमध्ये सीएसकेचे नेतृत्व केले, पण तो ही जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडू शकला नाही. या आठ सामन्यांपैकी फक्त दोन सामने सीएसकेने जिंकले आणि ६ सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
कर्णधाराच्या रूपात जडेजा पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर त्याने स्वतःहून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि ही जबाबदारी धोनीकडे पुन्हा एकदा सोपवली गेली होती. मागच्या हंगामात जडेजाचे वैयक्तिक प्रदर्शनही निराशाजनक होते. त्याने गोलंदाजीत ५ विकेट्स घेतल्या होत्या, तर फलंदाजी करताना अवघ्या ११२ धावांचे योगदान संघासाठी देऊ शकला होता. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून रवींद्र जडेजा संघासोबतच आहे. इंग्लंडविरुद्धच्या एजबस्टन कसोटी सामन्यात जडेजाने जबरदस्त फलंदाजी करत संघासाठी शतक ठोकले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या टी२०पूर्वी कर्णधार बटलरची संघासोबत ‘खास मीटिंग’, खेळाडूंना सांगितला विजयाचा मंत्र
विराट अन् रोहितमध्ये रंगणार वरचढ ठरण्याची जंग! कोण बनणार खास ‘त्रिशतका’चा पहिला मानकरी?