---Advertisement---

सीएसकेच्या कॅम्पमध्ये ‘वाथी कमिंग’ची हवा, ऋतुराजसह ‘यांनी’ धरला ताल; पाहा झक्कास व्हिडिओ

On: शनिवार, मार्च 20, 2021 3:07 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम सुरू होण्यासाठी एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. ९ एप्रिलपासून चेन्नई येथील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील सामन्याने या हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे. तत्पुर्वी ३ वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्ज संघ जोमाने तयारी करत आहे. दरम्यान खेळाडूंना मानसिक आराम मिळावा मौजमजा करण्याची मुभा देण्यात आली आहे. याचा फायदा घेत सीएसकेतील काही खेळाडूंनी प्रसिद्ध तमिळ गाण्यावर ताल धरला आहे.

सीएसकेने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडसह साई किशोर, एन जगदीशन आणि हरि निशांत हे युवा खेळाडू नाचताना दिसत आहेत. त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या विजय थलापतीच्या ‘वाथी कमिंग’ या तमिळ गाण्यावर ठुमके लावले आहेत.

https://www.instagram.com/p/CMmqgaxgyFO/?utm_source=ig_web_button_share_sheet

या रोमहर्षक व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या भारतीय संघासोबत अहमदाबादमध्ये असलेल्या सीएसकेचा गोलंदाज दिपक चाहरला देखील व्हिडिओ पाहून नाचण्याचे मन झाले. ‘मी ही मस्ती खूप मिस करत आहे’, अशी प्रतिक्रिया त्याने या व्हिडिओला पाहून दिली आहे.

एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघ गतवर्षी खास कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे यावर्षी चेन्नईचा संघ दमदार पुनरागमन चौथे जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळेल. ‘थाला’च्या सीएसकेचा पहिला सामना १० एप्रिल रोजी मुंबईत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होईल.

आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्स संघ

एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी

महत्त्वाच्या बातम्या-

“मिस्बाह-उल-हक म्हणजे गरिबांचा एमएस धोनी,” पाकिस्तानी दिग्गजाचं मोठं भाष्य

हे म्हणजे आपल्याकडे ठाकूर आहे पण शोलेवाला, असं झालं! ‘त्या’ निर्णयावरुन भारतीय दिग्गजाच्या पंचांना कानपिचक्या

ऐकलंत का! कॅप्टन कोहलीने २०२० मध्येच दिले होते ‘या’ धुरंधरच्या निवडीचे संकेत, स्वत:च केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---