आयपीएल 2025चा मेगा लिलाव (Mega Auction) सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडला. त्यामध्ये प्रत्येक संघाने आयपीएल 2025 साठी जोरदार तयारी केली. आगामी हंगामासाठी लिलावात सर्व संघांनी खतरनाक खेळाडूंना खरेदी करण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला. मात्र, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) खेळाडूंच्या नावापेक्षा कामावर जास्त भर दिला आहे. चेन्नईचा संघ पाहिला तर, त्यात फार मोठी नावे नाहीत. या कारणास्तव चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन फारशी खतरनाक नाही. या बातमीद्वारे आपण चेन्नईच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबद्दल जाणून घेऊ.
आयपीएल 2025 मध्ये कर्णधार रूतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे डावाची सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारणास्तव, कॉनवेला फ्रँचायझीने प्रथम खरेदी घेतले आणि 6.25 कोटी रुपयांची मोठी रक्कम दिली. मात्र, त्यांचा राखीव खेळाडू म्हणून रचिन रवींद्रही संघात आहे. राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.
यानंतर मधल्या फळीबद्दल बोलायचे झाले, तर शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. दीपक हुडा पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. तो ऑफ स्पिन गोलंदाजीही करतो. यानंतर सॅम करन, रवींद्र जडेजा खेळताना दिसतील. त्यानंतर एमएस धोनी शेवटच्या हंगामाप्रमाणेच त्याच्या भूमिकेत दिसेल. यावेळी चेन्नईने अश्विनला 9.75 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
खलील अहमद आणि मथिशा पाथिराना वेगवान गोलंदाजीत ॲक्शन करताना दिसतील. पाथिरानाला फ्रँचायझीने कायम ठेवले आहे. तर खलीलला लिलावात 4.80 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले. या हंगामात चेन्नईचा संघ केवळ 3 विदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवू शकतो. मात्र, गरज पडल्यास एखादा विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येऊ शकतो.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रूतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, खलील अहमद, मथिशा पाथिराना.
इम्पॅक्ट प्लेयर- नूर अहमद/जेमी ओव्हरटन/रचिन रवींद्र
महत्त्वाच्या बातम्या-
“माझा मुलगा तेंडुलकरपेक्षा मोठा बनेल…” माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य!
BAN vs WI; बांगलादेशला मिळाला नवा कर्णधार! 3 वर्षांनी खेळणार ‘हा’ खेळाडू!
“रोहितनंतर जसप्रीत बुमराह…” स्टार खेळाडूचे बुमराबद्दल मोठे वक्तव्य!