सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उर्वरित हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्स संघ सर्वप्रथम दुबई येथे पोहोचला आहे. संघाने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर लीगची तयारी सुरू केली. सीएसकेने गुरुवारपासून (१९ ऑगस्ट) दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये सरावाचा शुभारंभ केला.
खेळाडूंनी केल्या सोशल मीडिया पोस्ट
क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर संघातील खेळाडूंनी आपापल्या सोशल मीडिया खात्यांवरून छायाचित्रे शेअर केली. सीएसकेचा अष्टपैलू दीपक चाहर याने क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर बीचवर पोहोचल्यावर एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. सीएसकेचे अनेक खेळाडू आपल्या कुटुंबासोबत युएई येथे पोहोचले आहेत.
https://www.instagram.com/p/CSwJMiOhOsj/?utm_source=ig_web_button_share_sheet
सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीने बुधवारी रूम व्ह्यू आणि सूर्यास्ताचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याचबरोबर सीएसकेच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून सुरेश रैना आणि त्याच्या पत्नीचे एक छायाचित्र देखील शेअर करण्यात आलेले. यापूर्वी खेळाडूंच्या चेन्नई ते यूएई प्रवासाचा व्हिडिओ सीएसकेकडून शेअर केला गेला होता. तसेच, धोनी हॉटेलमध्ये स्नूकर खेळताना दिसलेला.
#Yellove at first sight 😍 #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/tzFM8GyrVv
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 19, 2021
Glimpse of our Super Kings 🦁🔥#WhistlePodu | @MSDhoni | @ImRaina pic.twitter.com/gWZ09FyFhW
— CSK Fans Army™ (@CSKFansArmy) August 19, 2021
Huddle ➡️ Hustle 🏃♂️#StartTheWhistles #Yellove 🦁💛 pic.twitter.com/VkaBmNetqv
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 19, 2021
गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे सीएसके
कोरोना महामारीमुळे आयपीएलचा चौदावा हंगाम मे महिन्यात अर्ध्यातून स्थगित करण्यात आला होता. सीएसकेने हंगामात आतापर्यंत सात सामने खेळताना ५ विजयांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. या हंगामात विजेतेपद पटकावण्याचा मानस सर्व खेळाडूंचा असेल. सीएसकेने यापूर्वी २०१०, २०११ व २०१८ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
आयपीएल २०२१ साठी सीएसकेचा संघ-
एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, एन जगदीशन, साई किशोर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, सी हरीनिशांत, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा, भगत वर्मा, के. गौतम, रॉबी उथप्पा, कर्ण शर्मा, के.एम आसिफ, हरीशंकर रेड्डी, फाफ डू प्लेसिस, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, जोस हेझलवूड, लुंगी एन्गिडी, मिचेल सॅन्टनर व इम्रान ताहीर.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसीची मोठी घोषणा; विश्वचषक २०२२ च्या क्वालिफायरचे ‘हा’ देश भूषवेल यजमानपद
T20 World Cup: आझमचं एक ऐकेनात निवडकर्ते, टी२०त १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूला संधी देण्यास नकार
ऐकलंत का! गंभीर म्हणतोय, “भारत पाकिस्तानपेक्षा मजबूत, पण अफगानिस्तानपासून आहे धोका”