आयपीएल 2023 हंगामातील 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व सनरायझर्स हैदराबाद हे संघ भिडले. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत हैदराबादला 134 पर्यंत रोखले. शानदार गोलंदाजीचे नेतृत्व रवींद्र जडेजाने करत आपला फॉर्म कायम राखला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र, फिरकीपटू गोलंदाजीला आल्यानंतर चेन्नईने सामन्यावर नियंत्रण मिळवले. रवींद्र जडेजा याने चेन्नईला या सामन्यात पुनरागमन करून देताना घातक गोलंदाजी केली. त्याने सुरुवातीला अभिषेक शर्मा याला बाद केले. त्यानंतर राहुल त्रिपाठी व मयंक अगरवाल यांना बाद करत हैदराबादला रोखण्यात मोठी भूमिका बजावली. जडेजाने 4 षटकात 22 धावा देत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
आयपीएल 2023 मध्ये जडेजा गोलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसला. पहिल्या दोन सामन्यात तो केवळ एक बळी मिळू शकला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या गोलंदाजीला धार आली. मुंबई इंडियन्सविरूद्ध केवळ पाचच्या इकॉनॉमीने धावा देेत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर राजस्थानविरुद्ध 2 बळी मिळवण्यात त्याला यश आलेले. आरसीबीविरुद्ध मात्र त्याला एकही बळी मिळाला नाही.
प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर हैदराबादला 35 धावांची सलामी मिळाली. अभिषेक शर्मा वगळता इतर फलंदाजांना अपयश आल्याने हैदराबादला 134 पर्यंतच मजल मारता आली. चेन्नईसाठी रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी मिळवले. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी पुन्हा एकदा दमदार सलामी देत संघाचा विजय निश्चित केला.
(Chennai Super Kings Ravindra Jadeja Consistent Performance In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आयपीएल 2023 ची फायनल! क्वालिफायर-एलिमिनेटर ‘या’ शहरात
‘त्या’ गोष्टीसाठी धोनी कधीच देत नाही नकार! सहकाऱ्याने सांगितला थालाच्या दिलदारीचा किस्सा