आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होण्यासाठी महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. सर्व संघांनी आयपीएलची तयारीसाठी सुरु केली असून, त्यांनी आपापली सराव शिबिरे सुरू केली आहेत. तीन वेळेच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने या बाबतीत आघाडी घेतली आहे. गेली काही दिवस हा संघ सातत्याने सराव करताना दिसतोय. त्यासोबतच, चेन्नईच्या सराव शिबिरात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज दिसून आला.
हा गोलंदाज दिसला चेन्नईच्या नेटमध्ये
आयपीएल २०२१ साठी चेन्नई संघाने दोन आठवड्यांपासून तयारी सुरू केली आहे. कर्णधार धोनीसह सुरेश रैना वगळता सर्व भारतीय खेळाडू या सराव शिबिरात सहभागी झाले आहेत. भारतीय गोलंदाजांसह श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज व ‘जूनियर मलिंगा’ म्हणून ओळखला जाणारा मथिशा पथीराना हा देखील नेटमध्ये दिसला होता.
आता, यासोबतच दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी टी२० गोलंदाज हार्डस विल्जोन हा आता चेन्नईच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना दिसून आला.
South Africa fast bowler Hardus Viljoen is one of the net bowlers of Chennai Super Kings in IPL 2021. pic.twitter.com/650VxBpjDG
— Johns. (@CricCrazyJohns) March 21, 2021
विल्जोनला आहे आयपीएलचा अनुभव
दक्षिण आफ्रिकेच्या टी२० संघांचा गोलंदाज असलेला विल्जोन आयपीएलचे दोन हंगाम किंग्स इलेव्हन पंजाब संघांसाठी खेळला आहे. या वर्षीच्या लिलावातही तो सहभागी झाला होता. त्याने आपली आधारभूत किंमत ५० लाख इतकी ठेवली होती. परंतु, त्याला कोणीही खरेदीदार लाभला नव्हता. त्याने ६ आयपीएल सामने खेळले असून ७ विकेट्स घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे, विल्जोन हा सीएसकेचा सलामीवीर फाफ डू प्लेसिस याचा मेहुणा आहे. विल्जोनने २०१९ मध्ये डू प्लेसिसची बहिण रेमी रायनर्स हिच्यासबत लग्न केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भविष्यात विराट कोहलीबरोबर सलामीला फलंदाजी करण्याच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर
युवी..युवी!! स्टेडियममध्ये प्रोस्ताहन देणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ शेअर करत युवराज म्हणाला….
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा करणार लग्नाचा व्हिडिओ लॉन्च, टीझर केला प्रदर्शित