---Advertisement---

धोनीचे आगमन ते आयपीएलला स्थगिती; चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक

---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाची सुरुवात एप्रिल महिन्यात मोठ्या उत्साहात झाली होती. मात्र, स्पर्धेला एक महिनाच पूर्ण होत नाही, तोच कोरोना व्हायरसच्या भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला. संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे सापडल्याने अखेर हा हंगाम ४ मे रोजी २९ सामन्यांनंतर स्थगित झाला. असे असले तरी आयपीएल संघांनी चाहत्यांचे मनोरंजन करणे सुरु ठेवले असून ते आपल्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला भावूक व्हिडिओ
नुकताच चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर एक भावूक करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी २०२१ हंगामातील संघाचा प्रवास दाखवला आहे. तसेच या हंगामात शानदार कामगिरी करणाऱ्या चेन्नई संघाने या व्हिडिओमधून असाही संदेश चाहत्यांना दिला आहे की जेव्हा आयपीएल पुन्हा सुरु होईल तेव्हा ते जशी स्पर्धा उत्तम फॉर्ममध्ये सुरु केली होती, तशीच संपवण्यासाठी परत येतील.

या व्हिडिओमध्ये २ मार्चपासून ४ मेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी दाखवल्या आहेत. या व्हिडिओला सुरुवात होते ती चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीच्या चेन्नईतील आगमनाने. त्यानंतर या व्हिडिओमध्ये खेळाडूंचे संघात आगमन, चेन्नई संघाचे सराव सत्रातील काही क्षण, खेळाडूंची मस्ती, फोटो शूटमधील काही क्षण दाखवले आहेत.

तसेच एकावेळी कोणालातरी धोनी ‘हा टी-शर्ट झिवाला फिट बसेल,’ असेही म्हणताना दिसत आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी चेन्नई संघातील खेळाडू मास्क वापरा असा सल्लाही देत आहेत, तसेच या कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण सर्व एकत्र आहोत, असेही सांगत आहेत.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1391757120605851652

हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक झाल्याचे दिसले. त्यांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/BiharWalaBanda/status/1391771445781360655

चेन्नईचे फलंदाजी-गोलंदाजी प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
आयपीएल २०२१ चा हंगाम स्थगित करण्यात आल्याच्या दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जेव्हा त्यांचा कोरोना अहवाल आला, तेव्हा संघ दिल्लीमध्ये होता. त्यानंतर या दोघांनाही एअर अँब्यूलन्समधून चेन्नईमध्ये आणण्यात आले होते. सध्या दोघांवरही चेन्नईत उपचार सुरु आहेत.

सीएसकेची आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी 
आयपीएल २०२१ हंगाम कोरोनाच्या कारणामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित झाला. पण या हंगामात सीएसकेची कामगिरी चांगली झाली होती. त्यांनी पहिला सामना पराभूत झाल्यानंतर सलग ५ सामने जिंकले होते. त्यानंतर मात्र, त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. पण स्पर्धा स्थगित झाली तेव्हा सीएसके संघ ७ सामन्यांतील ५ विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

एकच नंबर! आयपीएल २०२१ दरम्यान हैदराबादच्या खेळाडूंनी लुटला बास्केटबॉल खेळण्याचा आनंद, जुना व्हिडिओ व्हायरल

इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडूही ‘या’ कारणामुळे मुकणार उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाला? 

विराट-अनुष्काच्या मोहिमेला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद; पाच दिवसांत जमवला इतक्या कोटींचा कोरोना मदतनिधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---