येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. गतवर्षी युएईमध्ये पार पडलेली स्पर्धा यंदा भारतातच होणार आहे. आयपीएल २०२१ चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये रंगणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही ही संघ मैदानात घाम गाळत आहे. दरम्यान, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयपीएलचे ३ वेळेस जेतेपद पटकावणारा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा फटका बसला आहे.
आयपीएल २०२० स्पर्धा दुबईमध्ये खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. तसेच चेन्नई सुपर किंग्ज संघाला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. याचा त्यांना मोठा फटका बसला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी घसरण झाली आहे. ब्रँड व्हॅल्यूएशन एजेंसी ‘डफ अँड फेल्प्स’ यांच्या अहवालानुसार, २०२० मध्ये ३.६ टक्के घसरण झाली होती. त्यांची व्हॅल्यू २०१९ मध्ये ४७,५०० कोटी होती. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या घसरणीमुळे ही व्हॅल्यू ४५,८०० कोटी इतकी झाली होती.
मुंबई इंडियन्स संघ ब्रँड व्हॅल्यूमध्ये सर्वोच्च स्थानी टिकून आहे. मुंबई संघाची ब्रँड व्हॅल्यू ७६१ कोटी इतकी आहे. परंतु मुंबई इंडियन्स संघाच्या ब्रँड व्हॅल्यू मध्येही ५.९ टक्के घसरण झाली होती. २०१९ सालामध्ये या संघाची ब्रँड व्हॅल्यू ८०९ कोटी इतकी होती. सर्वात जास्त फटका धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला बसला आहे. २०१९ मध्ये ७३२ कोटी रुपये असणारी ब्रँड व्हॅल्यू ,१६.५ टक्के घसरण झाल्यानंतर ६११ कोटी इतकी झाली आहे.
तसेच दुसऱ्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स संघ आहे. या संघाच्या ब्रँड व्हॅल्यू मध्ये १३.७ टक्के घसरण झाली आहे. यानंतर ब्रँड व्हॅल्यू ६२९ कोटी वरून घसरून ५४३ कोटी इतकी झाली आहे. तसेच तिसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ आहे. ९ टक्के घसरण झाल्यानंतर या संघाची ब्रँड व्हॅल्यू ५३६ करोड वरून ४४२ कोटी इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा ५ परदेशी खेळाडू खेळवण्यात आले अन् घडले असे काही की…