इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या पुढील हंगामासाठी, सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याचे नाव पाहून चाहते भलतेच खूश झाले. मागील वर्षी फ्रँचायझी आणि जडेजा यांच्यात काहीतरी बिनसले याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. त्यामुळे यावेळेस जडेजा चेन्नईत दिसणार नाही, असे तर्क वितर्क लावले जात होते. मात्र, चेन्नईने त्याला आपल्या संघात कायम ठेवल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्यासाठी आयपीएल 2022चा हंगाम कठिण होता, कारण त्याला नेतृत्व दिले तेव्हा त्याचे आणि संघाचे प्रदर्शन निराशाजनक झाले. त्यानंतर त्याने एमएस धोनी याला नेतृत्व परत दिले, मात्र संपूर्ण हंगाम तो खेळू शकला नाही. कारण दुखापतीमुळे तो बाहेर झाला. 2021चा विजेता संघ 2022च्या बाद फेरीत देखील पोहोचू शकला नाही.
2022च्या आयपीएलनंतर जडेजा संघासोबत दिसणार नाही अशा चर्चां रंगल्या होत्या. तसेच, जडेजाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून सीएसकेच्या सर्व पोस्टही हटवल्या होत्या. मात्र मंगळवारी (15 नोव्हेंबर) सीएसकेने यादी जाहीर करत स्पष्ट केले की जडेजा संघाचा भाग आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करताना लिहिले, ‘आठवे आश्चर्य आमच्यासोबत राहणे’, ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Eighth wonder to stay with us! ♾????#WhistlePodu #Yellove ???????? @imjadeja pic.twitter.com/VlKqhSA4h1
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2022
तसेच जडेजाने स्वतःचे आणि धोनीचे एक छायाचित्रही ट्विट केले. यात जडेजा हसत हसत धोनीला अभिवादन करताना दिसून येतोय. या छायाचित्रासोबत जडेजाने लिहिले की, ‘सर्व ठीक आहे. रिस्टार्ट.’
हे ट्विट सीएसकेने रिट्विट केले आहे नेहमी आणि कायम’ असे कॅप्शन दिले.
Always and Forever! ????♾ https://t.co/AC3Q9TzFI6
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2022
चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी:
एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), रवींद्र जडेजा, डेवॉन कॉनवे, मोईन अली, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, महिश तिक्षणा, प्रशांत सोलंकी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, राजवर्धन हंसद , मिचेल सॅंटनर, मथिशा पथिराना, सुभ्रांशू सेनापती. Chennai Super Kings Tweet About Ravindra Jadeja
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…
आयपीएल रिटेन्शन: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? किती खेळाडूंवर लागणार बोली? घ्या जाणून