---Advertisement---

खडतर प्रवासानंतर कोलकात्याची फायनलमध्ये धडक, पण चेन्नईची ‘ही’ आकडेवारी घाम फोडणारी

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 11:09 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. प्लेऑफमध्ये चेन्नई संघाने पहिल्याच क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला धोबीपछाड देत सर्वात आधी अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसरीकडे कोलकाताने सुरुवातीला एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सला धाराशाही करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

चेन्नईचे पारडे कोलकात्यापेक्षा खूप जड
आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई आणि कोलकाता संघ २७ वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी तब्बल १७ सामन्यांमध्ये चेन्नई संघाने विजय मिळवला आहे. तर फक्त ९ सामन्यात कोलकाता संघाला विजयी पताका झळकावता आली आहे. त्यातही उभयंतांमध्ये युएईत झालेल्या सामन्यांविषयी बोलायचे झाल्यास, या दोन्ही संघांमध्ये युएईच्या मैदानांवर ३ सामने झाले आहेत. त्या ३ सामन्यांपैकी २ सामन्यात चेन्नईने बाजी मारली आहे. तर कोलकाताच्या नशीबी फक्त १ विजय आला आहे.

दुबईचे मैदान, जेथे चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे, या मैदानावर हे दोन्ही संघ फक्त एकदाच एकमेकांशी भिडले आहेत. या सामन्यातही चेन्नई संघाने कोलकात्याला चितपट केले आहे.

आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई कोलकातावर भारी
एवढेच नव्हे तर, आयपीएल २०२१ च्या हंगामातही कोलकातापुढे चेन्नईचेच पारडे जड राहिले आहे. साखळी फेरी सामन्यांमध्ये २ वेळा हे संघ आमने सामने आले आहेत. या दोन्हीही सामन्यात कोलकाताला पराभवास सामोरे जावे लागले आहे. पहिल्या टप्प्यात २१ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाताला १८ धावांनी पराभूत केले होते. तर दुसऱ्या टप्प्यात २६ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने २ विकेट्सने विजय मिळवला होता.

चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यातील मागील ५ सामन्यांविषयी बोलायचे झाल्यास, इथेही चेन्नईचा संघच कोलाकातावर सरस ठरला आहे. या ५ सामन्यांपैकी फक्त १ सामना जिंकण्यात कोलकात्याला यश आले आहे.

एकंदरीत पाहायचे झाल्यास, कोलकात्यापेक्षा चेन्नईचे पारडे जास्त जड दिसते आहे. अशात अंतिम सामन्यात पुन्हा एकदा चेन्नईच कोलकाताला पराभूत करेल की नाही?, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

अंतिम सामन्यात सीएसकेसाठी ‘हा’ धुरंधर ठरेल कर्दनकाळ! कर्णधार धोनीला भक्कम रणनितीची गरज

केकेआरचा कॅप्टन मॉर्गन घेणार धाडसी निर्णय, फायनलमध्ये स्वत: बाकावर बसत ‘या’ खेळाडूला देणार संधी!

अंतिम सामन्यात सीएसके ‘या’ शिलेदाराला देणार दे धक्का! तब्बल ८ आयपीएल फायनलचा आहे अनुभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---