इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 6वा सामना सोमवारी (दि. 3 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्याला 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी चेन्नई विरुद्ध लखनऊ संघात 7 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक लखनऊने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात चेन्नई संघ मागील पराभवापासून धडा घेत विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
https://twitter.com/IPL/status/1642883831979204608?t=OUFmSt9ILz4TyVpIusQokw&s=19
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा हा दुसरा सामना आहे. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात चेन्नईला गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 5 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. तसेच, लखनऊ सुपर जायंट्स संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 50 धावांनी विजय मिळवला होता.
आमने-सामने कामगिरी
चेन्नई विरुद्ध लखनऊ संघातील आमने-सामने कामगिरी पाहिली, तर हे दोन्ही संघ फक्त एकदाच एकमेकांशी भिडले आहेत. आयपीएल 2022 हंगामातील एका सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 210 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने क्विंटन डी कॉक आणि एविन लुईस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 19.3 षटकात 211 धावा केल्या होत्या. तसेच, चेन्नईला 6 विकेट्सने पराभूत केले होते. (Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Toss ipl 2023 6th match)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स
डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगरगेकर
लखनऊ सुपर जायंट्स
केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बदोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान
(CSKvLSG Lucknow Won Toss Elected Bowl First)






