रविवारी (दि. १ मे) आयपीएल २०२२च्या हंगामात डबल हेडरमधील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला गेला. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२च्या ४६व्या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने १३ धावांनी विजय मिळवला. या विजयात ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे आणि मुकेश चौधरी यांनी मोलाचे योगदान दिले. ऋतुराजला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने गोलंदाजीचा निर्णय घेत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित २० षटकात फक्त २ विकेट्स गमावत २०२ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला ६ विकेट्स गमावत १८९ धावाच करता आल्या.
That's that from Match 46 of #TATAIPL.@ChennaiIPL win by 13 runs against #SRH.
Scorecard – https://t.co/8IteJVPMqJ #SRHvCSK #TATAIPL pic.twitter.com/TuCa1F2mKs
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निकोलस पूरनची अर्धशतकी खेळी व्यर्थ
या पराभवामुळे त्यामुळे त्यांना या हंगामात चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादकडून फलंदाजी करताना निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३२ चेंडूत ६३ धावा केल्या. यामध्ये ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. मात्र, त्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. कर्णधार केन विलियम्सनने ४७ धावा चोपल्या. यामध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त अभिषेक शर्माने ३९ धावांचे योगदान दिले. तसेच, एडन मार्करमने १७, तर शशांक सिंगने १५ धावा केल्या.
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मुकेश चौधरीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मिशेल सँटनर आणि ड्वेन प्रिटोरियसन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
ऋतुराज गायकवाडच्या सर्वाधिक धावा
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना चेन्नईकडून युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५७ चेंडूत ९९ धावांची खेली केली. या धावा करताना त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त डेवॉन कॉनवेने ५५ चेंडूत नाबाद ८५ धावा कुटल्या. यामध्ये ४ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. पुढे कर्णधार एमएस धोनी ८ धावा करून बाद झाला, तर जडेजा १ धावेवर नाबाद होता.
या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत नवव्या स्थानी कायम आहे. दुसरीकडे, हैदराबाद संघ चौथ्या स्थानी कायम आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शंभराहून मोलाचे नव्व्याण्णव! ऋतुराजचे आयपीएलमधील दुसऱ्या शतकाचे स्वप्न भंगले
याला म्हणतात सातत्य! एक, दोन नव्हे सलग ५ हंगामात केएल राहुलने खोऱ्याने काढल्यात धावा