मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामात पहिला विजय मिळवण्यासाठी धडपडत होता. मात्र, चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या या स्वप्नाला सुरंग लावला. गुरुवारी (दि. २१ एप्रिल) डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअममध्ये पार पडलेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर एमएस धोनीने चौकार मारत चेन्नईला मुंबईविरुद्ध ३ विकेट्सने सामना जिंकून दिला. तसेच, हंगामातील दुसरा विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात गोलंदाज आणि फलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. या विजयाचा शिल्पकार एमएस धोनी ठरला. तसेच, या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्यामुळे मुकेश चौधरीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यादरम्यान फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १५५ धावा केल्या. हे आव्हान चेन्नईने ७ विकेट्स गमावत पूर्ण केले.
MSD finishes it off in style!!! #TATAIPL pic.twitter.com/ZhtyE2UKfW
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
धोनीचा चौकार चेन्नईच्या विजयाचे कारण
चेन्नईकडून फलंदाजी करताना यावेळी अंबाती रायुडूने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने ३५ चेंडूंचा सामना करताना ४० धावा केल्या. यामध्ये २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबतच रॉबिन उथप्पाने ३० धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एमएस धोनीने (MS Dhoni) नाबाद राहत विजयी चौकार मारत सामना जिंकवला. यावेळी त्याने २८ धावा केल्या. त्याच्यासोबतच ड्वेन प्रिटोरियसनेही २२ धावांचे योगदान दिले.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना डॅनियल सॅम्सने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त जयदेव उनाडकटने २ विकेट्स आणि रिले मेरेडिथ १ विकेट आपल्या नावावर केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबईच्या तिलक वर्माचे अर्धशतक व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सकडून युवा फलंदाज तिलक वर्मा चमकला. त्याने यादरम्यान मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या. ४३ चेंडूंचा सामना करताना वर्माने ५१ धावा चोपल्या आणि हंगामातील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. या अर्धशतकात २ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. मात्र, त्याचे हे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने ३२ आणि ऋतिक शोकीनने २५ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त जयदेव उनाडकटने नाबाद १९ आणि कायरन पोलार्डने १४ धावा केल्या. याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशनला एकही धाव करता आली नाही. ते शून्य धावेवर तंबूत परतले. तसेच, डेवाल्ड ब्रेविसही ४ धावा करत बाद झाला.
यावेळी चेन्नईकडून गोलंदाजी करताना मुकेश चौधरीने सर्वाधिक विकेट्स आपल्या खिशात घातल्या. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना फक्त १९ धावा देत ३ विकेट्स चटकावल्या. तसेच, ड्वेन ब्रावोनेही २ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. या दोघांव्यतिरिक्त मिशेल सँटनर आणि महीश तीक्षणा यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
या विजयासह चेन्नईने ४ गुण मिळवले आहेत. गुणतालिकेत ते नवव्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, मुंबई या पराभवासह पुन्हा एकदा तळाशीच दहाव्या क्रमांकावर कायम राहिलीये.
मुंबई आणि चेन्नईचा पुढील सामना १२ मे रोजी वानखेडे येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई चेन्नईला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाव मोठं अन् लक्षण खोटं! कोट्यावधी रुपयांमध्ये विकले गेलेले ‘हे’ तीन परदेशी खेळाडू ठरतायत फ्लॉप
मुंबईचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता पहिल्याच षटकात तंबूत; रोहितच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
‘भारत- पाकिस्तानपेक्षा कमी नाही मुंबई आणि चेन्नईचा सामना’, असं का म्हणाला हरभजन सिंग?