---Advertisement---

हैदराबादला पराभूत करून अव्वल चौघांत एन्ट्री मारण्याचे चेन्नईयनचे लक्ष्य!

On: बुधवार, जानेवारी 12, 2022 7:36 PM
Chennaiyin-FC
---Advertisement---

गोवा| चेन्नईयन एफसी व हैदराबाद एफसी यांना इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) मागील सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली आहे आणि त्यामुळे दोन्ही संघ पुनरागमनासाठी गुरुवारी मैदानावर उतरणार आहेत. चेन्नईयनचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे आणि हैदराबाद एफसीला पराभूत करून त्यांना चौथ्या क्रमांकावर झेप घेता येणार आहे. चेन्नईयनच्या खात्यात १४, तर हैदराबादच्या खात्यात १६ गुण आहेत.

चेन्नईयनला मागील सामन्यात एफसी गोवा संघाकडून हार मानावी लागली, परंतु त्यांचा बचाव हा कौतुकास्पद होता. बार्थोलोमेव ऑग्बेचे याच्या गैरहजेरीत हैदराबादची कसोटी लागणार हेही निश्चित आहे. चार पिवळे कार्ड मिळाल्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी आहे. ऑग्बेचे हा हैदराबादचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मर्क्यूज यांची कसोटी लागणार आहे.

”या पर्वाच्या सुरुवातीला चेन्नईयनविरुद्धचा पराभव हा अपघात होता. आमच्या चुकांचा त्यांनी फायदा उचलला. त्यामुळे त्या सामन्यातून काय शिकलो, यापेक्षा मिळणाऱ्या संधीवर गोल कसा करता येईल, याचा विचार व्हायला हवा. फुटबॉलमध्ये केव्हा काय घडेल, हे कुणीच सांगू शकत नाही,”असे मर्क्यूज यांनी सांगताना चेन्नईयन संघाविरुद्धच्या मागील सामन्यातील पराभवावर खंत व्यक्त केली. याचवेळी ऑग्बेचेच्या अनुपस्थितीचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चेन्नईयनच्या कामगिरीचा विचार केल्यास त्यांच्या आक्रमणात सातत्य दिसत नाही. त्यांना मागील १० सामन्यांत केवळ ९ गोल करता आले आहेत आणि ही अन्य संघांच्या तुलनेतील खराब कामगिरी आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रशिक्षक बोझिदार बँडोव्हिच यांच्या चिंतेत ही गोष्ट भर पाडणारी आहे. त्यात दुखापतीमुळे बाहेर असलेल्या व्लॅदिमिर कोमान याची अनुपस्थितीही संघासाठी मोठी चिंतेची बाब आहे.

”आम्ही आमच्या ताकदीनुसार खेळ करणार आहोत आणि निकालातून ते आम्ही दाखवून देऊ. आम्ही मँचेस्टर सिटी क्लब नाही आहोत. आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. मागील सामन्यात अपयशी ठरलो, परंतु आम्ही आमच्याकडून सर्वोत्तम खेळ करू,”असे बँडोव्हिच यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

सेफ हँड्स! फलंदाजीत नव्हे पण ‘या’ गोष्टीत विराट कोहलीचा ‘शतकी’ कारनामा

चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ऍव्हेंजर्सचा संघर्षपूर्ण विजय

चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत टायगर्स, एफसी बिटल्स संघांचे विजय

हेही पाहा-

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---