26 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान इराणमधील हमदान शहरात होत असलेल्या एशियन टीम चेस चॅम्पियनशीप स्पर्धेतून बुरखा न घालण्याच्या कारणावरून ग्रॅन्डमास्टर सौम्या स्वामिनाथन हिने या स्पर्धेतून नुकतीच माघार घेतली होती.
सौम्याने फेसबुकवर वाॅलवर पोस्ट लिहून बुरख्या विरोधात बंड पुकारत स्पर्धेतून माघार घेतली होती.
सौम्याने बुरख्याला विरोध करून स्पर्धेत सहभागी न होण्याच्या निर्णयाचे क्रीडा जगतातून स्वागत झाले होते. तसेच अनेक क्रीडा रसिकांनी तीला पाठींबा दिला होता.
याच मुद्यावरून भारताचा क्रिकेपटू मोहम्मद कैफनेही आता ट्वीटर या सोशल नेटवर्किंग साईट वरून सौम्याला पाठींबा दर्शवला आहे.
“इराणमधिल एशियन टीम चेस चॅम्पियनशीप स्पर्धेतून सौम्याच्या माघार घेण्याच्या निर्णयाला सलाम करतो. कोणत्याही खेळाडूवर कोणत्याही धार्मिक पोशाखाची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. जे देश सामान्या मानवी हक्काचा अवलंब करू शकत नाहीत अशा देशांना आतंरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद देऊ नये.” असे भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद कैफ आपल्या ट्वीटर अकाऊंट वर म्हणाला.”
Hats off to Soumya Swaminathan for pulling out of this event in Iran.
There should be no scope for religious dress codes to be imposed on Players. A host nation should not be granted permission to host auch international events if it fails to consider basic human rights. pic.twitter.com/soQ9SVHYS6— Mohammad Kaif (@MohammadKaif) June 13, 2018
यापूर्वी भारताची महिला शूटर हिना सिद्धूने याच कारणावरुन एशियन एअर गन मीटर स्पर्धेतून माघार घेतली होती.