---Advertisement---

तुझं कौतुक कराव तेवढ कमीच! शहर गाठताच घरी न जाता सकारिया गेला रुग्णालयात, घेतली कोरोनाग्रस्त बापाची भेट

On: शुक्रवार, मे 7, 2021 9:10 AM
---Advertisement---

भारत देशात सध्या कोरोना व्हायरस महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज लाखोच्या संख्येत लोकांना या महामारीची लागण होत आहे. तर हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. या महामारीचा फटका क्रिडाक्षेत्रालाही बसला असून इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. दिवसेंदिवस या लीगमध्ये सहभागी खेळाडू आणि इतर सदस्यांमधील कोरोना लागणीची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयानंतर भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटू आपापल्या घरी परतण्याच्या मार्गावर आहेत. अशात राजस्थान रॉयल्स संघाचा युवा गोलंदाज चेतन सकारियाही त्याची राहत्या घरी पोहोचला आहे. तत्पुर्वी त्याने एक कृत्य करत सर्वांची मने जिंकली आहेत.

सकारिया हा गुजरात राज्यातील भावनगर शहरातील राहणारा आहे. आयपीएल स्थगित होण्याच्या आठवडाभर आधी त्याचे वडिल कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे भावनगर येथे पोहोचल्यानंतर घरी न जाता सकारिया थेट आपल्या वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत तो त्यांच्याजवळ बसून होता. त्याच्या वडिलांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्याची चिंता वाढली आहे.

काही महिन्यांपुर्वी आपल्या सख्या भावाला गमावल्यामुळे अशा कठीण परिस्थितींचा सामना करण्याची हिंमत त्याच्यात आहे. सुदैवाने आपण घरी येताना आपल्याला आपली पगार मिळाल्याने तो आंनदित आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सकारिया म्हणाला की, “मी नशिबवान आहे की, मला काही दिवसांपुर्वीच राजस्थान रॉयल्स संघाकडून माझी पगार मिळाली आहे. पैसे मिळताच मी त्वरित ते घरी पाठवले होते. आता त्याच पैशांचा वापर माझ्या कुटुंबाला होत आहे. या कठीण काळात त्यांना याची नितांत गरज होती.”

“लोक म्हणत आहेत की आयपीएल रद्द करा. मी त्यांना सांगू इच्छितो की, माझ्या घरात मी एकटाच कमावता व्यक्ती आहे. त्यातही क्रिकेट हेच माझे कमाईचे एकमेव स्त्रोत आहे. मी आयपीएलद्वारे जेवढे पैसे कमावले आहेत, त्याद्वारेच मी माझ्या वडिलांंना चांगले उपचार देऊ शकत आहे. जर एक महिनाभरासाठीही आयपीएल झाले नसते, तर मला आणि माझ्या कुटुंबाला आता खूप संघर्ष करावा लागला असता. मी अतिशय गरीब कुटुंबातून आलो आहे. माझ्या वडिलांनी त्यांचे पूर्ण आयुष्य टेम्पोचालकाचे काम केले आहे. आयपीएलमुळे माध्या जिवनाला वेगळे वळण मिळाले आहे,” असे त्याने पुढे म्हटले.

अवघ्या २० लाखांच्या मुळ किंमतीसह आयपीएल २०२१ लिलावात उतरलेल्या सकारियाला राजस्थान रॉयल्सने १.२० कोटींना विकत घेतले होते. या हंगामात ७ सामने खेळताना त्याने एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या ३१ चेंडूवर ३ विकेट्सचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लेकीची वेडी माया! ‘बाबा सुपरमॅनसारखा लढ आणि लवकर बरा हो’, कोरोना पॉझिटिव्ह वडिलांना लेकीचा भावुक संदेश

टेस्ट चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकते ‘सरप्राइज एंट्री’, पाहा कोण आहे तो

आयपीएल अर्ध्यात सोडून आपल्या घरी परतताना भावूक झाली युजवेंद्र चहलची पत्नी; ‘या’ खेळाडूंसह केला फोटो शेअर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---