---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी अनुभवी चहलला का मिळाले नाही टीम इंडियात स्थान, मुख्य निवडकर्त्यांनी केले स्पष्ट

On: गुरूवार, सप्टेंबर 9, 2021 3:34 PM
---Advertisement---

बीसीसीआयने बुधवारी (८ सप्टेंबर) टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही संघ निवड करताना काही अश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. भारताकडून टी२०मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युजवेंद्र चहलला या स्पर्धेसाठी भारतीय संघान निवडण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पण, आता त्याला वळगण्याचा निर्णय का घेण्यात आला याबद्दल मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा माहिती दिली आहे.

ऑनलाइन पत्रकार परिषदेत चहलला वगळण्याबाबद बोलताना संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा म्हणाले की, ‘वेगवान चेंडू टाकणाऱ्या फिरकीपटूंना आमचे प्राधान्य होते. म्हणून आम्ही राहुल चाहर सोबत गेलो.’ चेतन शर्मा असेही म्हणाले की, वरुण चक्रवर्ती हा एक ‘मिस्ट्री स्पिनर’ म्हणून संघात सामील झाला आहे. तो विरोधी संघासाठी एक ‘सरप्राईज पॅकेज’ ठरेल.

यष्टीरक्षक पर्यायांबाबत शर्मा म्हणाले की, रिषभ पंत पहिल्या क्रमांकासाठी, तर इशान किशन दुसऱ्या क्रमांकासाठी पसंती असेल. संघ व्यवस्थापन केएल राहुलचा शेवटचा पर्याय म्हणून वापर करू शकतो. भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीबाबत चेतन शर्मा म्हणाले की, ‘रोहित शर्मा आणि केएल राहुल याशिवाय ईशान किशन देखील सलामीला फलंदाजी करू शकतो.’ याशिवाय त्यांनी हार्दिक पंड्याबद्दल स्पष्ट केले की तो प्रत्येक सामन्यात त्याच्या षटकांचा कोटा पूर्ण करेल.

टी-२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचे मार्गदर्शक बनवण्यात आले आहे, हे उल्लेखनीय आहे. आता ड्रेसिंग रूम आणि संघाच्या रणनीतीमध्ये धोनीची महत्त्वाची भूमिका असेल. धोनीला आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे त्याला संघात समाविष्ट करून घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतीय संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धेत, येत्या २४ ऑक्टोबर पासून सुरुवात करायची आहे. अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा खेळाडूंना होऊ शकतो. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याच्या पाच दिवस आधीपर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात. आयपीएलमधील कामगिरीनंतर नवीन नावांना संधी मिळते का हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘जेव्हा धोनी ड्रेसिंग रुममध्ये सरप्राईज एन्ट्री घेईल तेव्हा…’, माही मेंटॉर बनताच जाफरने शेअर केले रजनीकांतचे मीम

धोनीला नेटमध्ये सराव देणाऱ्या श्रीलंकन खेळाडूचा धमाका; वनडे पदार्पणात ४ विकेट्स घेत मिळवून दिला विजय

तब्बल २.४० कोटींची बोली लागलेला मिस्ट्री स्पिनर होता डिप्रेशनमध्ये, मग एका फोनकॉलने बदलले आयुष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---