---Advertisement---

धोनीला नेटमध्ये सराव देणाऱ्या श्रीलंकन खेळाडूचा धमाका; वनडे पदार्पणात ४ विकेट्स घेत मिळवून दिला विजय

On: गुरूवार, सप्टेंबर 9, 2021 2:41 PM
---Advertisement---

नुकतीच दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली. श्रीलंकेकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या महिष तीक्ष्णाने चार विकेट्ससह कारकिर्दीला शानदार सुरुवात केली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० षटकात, ३७ धावा देत चार बळी घेतले. या सामन्यात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव केला. मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना होता.

या विजयासह श्रीलंका संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. विशेष म्हणजे पहिल्याच चेंडूवर महिष तीक्ष्णाने विकेट घेत कारकिर्दीला सुरुवात केली.

महिष तीक्ष्णा हा आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा राखीव खेळाडू आहे. याचवर्षी, श्रीलंकेचे दोन खेळाडू, महिष तीक्ष्णा आणि माथीशा पाथिराना यांना आयपीएल २०२१ सुरू होण्यापूर्वी चेन्नईला बोलावण्यात आले होते. सीएसकेने श्रीलंकेच्या या दोन गोलंदाजांना सरावादरम्यान मदतीसाठी चेन्नईला बोलावले होते.

श्रीलंकेचे हे दोन खेळाडू चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग नव्हते, पण त्यांनी फलंदाजांना नवीन हंगामाच्या तयारीत मदत केली होती. महिष हा उजव्या हाताचा फिरकीपटू आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो लंकन प्रीमियर लीगमधील जाफना स्टॅलियन्सचा भाग राहिला आहे.

दुसरीकडे, पाथिराना हा वेगवान गोलंदाज आहे. पाथिरानाला श्रीलंकेचा नवीन ‘मलिंगा’ म्हटले जात आहे. गेल्या वर्षी १९ वर्षाखालील संघात या गोलंदाजाने आपल्या वेगाने आणि शैलीने बरीच प्रसिद्धी मिळवली. त्याची शैली लसिथ मलिंगासारखी आहे.

सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने खुलासा केला की, खेळपट्टी लक्षात घेऊन आम्ही तीक्ष्णाला या सामन्यात घेतले. पुढे शनाका म्हणाला की, तीक्ष्णा एक चांगला गोलंदाज आहे, श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या टी-२० स्पर्धेत तो खूप प्रभावी ठरला आहे. त्याने ६.४२ च्या सरासरीने चार बळी घेतले. तीक्ष्णाने फक्त ११ लिस्ट ए सामने खेळले आहेत, त्यात त्याने १६.१५ च्या सरासरीने १९ बळी घेतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

तब्बल २.४० कोटींची बोली लागलेला मिस्ट्री स्पिनर होता डिप्रेशनमध्ये, मग एका फोनकॉलने बदलले आयुष्य

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात काहींची सरप्राईज एन्ट्री, तर काहींचा पत्ता कट; वाचा ५ महत्त्वाच्या गोष्टी

पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खूशखबर! ‘हा’ खेळाडू दुखापतीतून सावरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---