---Advertisement---

पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खूशखबर! ‘हा’ खेळाडू दुखापतीतून सावरला

On: गुरूवार, सप्टेंबर 9, 2021 12:50 PM
Team-India
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चार सामने पार पडले आहेत. भारतीय संघाने चौथा कसोटी सामना १५७ धावांनी जिंकला असून मालिकेतही २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला आहे.

तो आता पाचव्या कसोटी सामन्यात सामील होण्यासाठी फिट झाला आहे. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना लहान दुखापत झाल्यामुळे ओव्हल येथे पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. यानंतर आता शमी संघासोबत सराव करण्यासाठी सहभागी झाला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या (बीसीसीआय)  एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शमीच्या दुखापतीतून सावरण्याबाबत माहिती दिली आहे. तो म्हणाला, शमी फिट आहे आणि जेव्हा शमी फिट असेल, तेव्हा तो पहिली पंसती असतो.

शमी फिट झाल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि एकमात्र उपलब्ध प्रशिक्षक विक्रम राठोर यांना पाचव्या सामन्याआधी पर्यायांवर विचार करण्यासाठी मदत मिळेल. फलंदाज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजार हे देखील दुखापतग्रस्त आहेत. ते अजूनही मेडिकल टीमच्या निदर्शनाखाली आहेत.

रोहित दुखापतीतून लवकर बरा होत आहे आणि तो पाचव्या सामन्यात सहभागी होईल, अशी शक्यता आहे. मात्र, मेडिकल टीमच्या परवानगीनंतरच त्याला संघात सामील केले जाऊ शकते. जर रोहित सामन्याच्या आधी फिट झाला नाही, तर त्याच्या जागी मयांक अगरवाल, अभिमन्यु ईश्वरन आणि पृथ्वी शाॅ यांच्यातील एकाला संधी मिळू शकते. पुजाराच्या आनुपस्थितीत हनुमा विहारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यातील एकाला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

कही खुशी कही गम! अश्विनचे ४ वर्षांनी भारतीय टी२० संघात पुनरागमन, पण सर्वाधिक विकेट्स घेणारा चहल बाहेर

गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर

…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---