---Advertisement---

‘आम्ही पाच जण संपूर्ण भारताचे क्रिकेट चालवतो’, स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांची बडी बात

chetan sharma an selection committee
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी अनेक खळबळजनक दावे करत भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आणला आहे. एका स्टिंग ऑपरेशन मध्ये त्यांनी असे काही खुलासे केले आहेत, ज्यामुळे आगामी काळात भारतीय क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी घडून येऊ शकतात. या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारताचे क्रिकेट फक्त पाच लोक चालवतात असे त्यांनी म्हटले आहे.

नुकतेच एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले. यादरम्यान चेतन शर्मा हे अनेक गोष्टींचा उलगडा करताना दिसले. या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय क्रिकेटच्या वर्तमान काळात घडत असलेल्या अनेक गोष्टींचे खुलासे त्यांनी केले. खेळाडूंचा फिटनेस ते खेळाडूंमधील अनेक वाद या मुद्द्यावर ते बोलताना दिसत आहेत. याच स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी दावा केला की, भारताचे क्रिकेट फक्त निवडकर्तेच चालवतात.

या व्हिडिओमध्ये ते बोलताना दिसत आहेत की,

“आम्ही पाच जण (निवडकर्ते) भारताचे क्रिकेट चालवतो. भारतीय संघाचा वर्तमान आणि भविष्य आम्हीच ठरवतो. फिटनेस आणि फॉर्म यासह अनेक गोष्टींचा पूर्ण विचार करूनच खेळाडूंची निवड होत असते.”

चेतन शर्मा यांनी या स्टिंग ऑपरेशन मध्ये भारतीय खेळाडू इंजेक्शन घेऊन आपला फिटनेस सिद्ध करतात असे म्हटले आहे. तसेच अनेक खेळाडू वैयक्तिकरित्या आपल्या संपर्कात राहतात असे देखील म्हटले. मागील वर्षी गाजलेला विराट कोहली व सौरव गांगुली यांचा वाद हा निरर्थक होता व त्यामध्ये विराट कोहली याने टोकाची भूमिका घेतल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच संजू सॅमसन याला संघात जागा न दिल्याने लोक आम्हाला ट्विटरवर ट्रोल करतात हे देखील त्यांनी सांगितले.

(Chetan Sharma Said Selectors Run Indian Cricket In Sting Operation)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! ‘टीम इंडियाचे खेळाडू इंजेक्शन घेऊन फिटनेस सिद्ध करतात’, मुख्य निवडकर्त्याचा सनसनाटी खुलासा
व्हॅलेंटाईनच्या दिवशी शुबमनने शेअर केला साराने हजेरी लावलेल्या कॅफेतील फोटो, नक्की भानगड काय?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---