भारतीय कसोटी संघाचा नवीन मिस्टर डिपेंडेबल म्हणून ओळखला जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने आज भारताकडून खेळताना कसोटी क्रिकेटमधील ९वे शतक लगावले आहे. पुजारानंतर भारताच्या या उपकर्णधाराने आपले शतक फक्त १५० चेंडूत पूर्ण केले आहे.
या कसोटी मालिकेत शतक करणारा रहाणे हा ५वा भारतीय फलंदाज बनला आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी दोन फलंदाजांनी सलग दोन कसोटीमध्ये शतक करण्याची भारतीय फलंदाजांची ही पहिलीच वेळ आहे.
अजिंक्यचे हे मागील १८ डावात पहिले शतक आहे असून यापूर्वी त्याने २०१ ६मध्ये इंदोर येथे न्यूझीलंड विरुद्ध १८८ धावांची खेळी केली होती आणि ती त्याची सर्वाधिक धावसंख्या सुद्धा तीच होती. मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत रहाणेने पाचव्यांदा शतकी खेळी केली आहे.
रहाणेची ही परदेशी भूमीवरील सहावी खेळी आहे तर आशियाच्या बाहेर त्याने आजपर्यंत ४ शतके केली आहेत. भारताच्या उपकर्णधाराच्या नावावर सध्या ३९ कसोटीमध्ये ५३.१८च्या सरासरीने २७६० धावा आहेत. त्यात त्याने १४ अर्धशतके केली आहेत.