जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. जगभरातील सर्वच क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, भारतातच होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सहभाग घेण्यास नकार दिला. भारतीय कसोटी संघाचे प्रमुख खेळाडू असलेल्या चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी यांनी आयपीएल 2023 साठी होणाऱ्या लिलावात आपले नाव नोंदवले नाही.
कोची येथे 23 डिसेंबर रोजी आयपीएल 2023 चा लिलाव पार पडेल. त्यासाठी 900 पेक्षा अधिक खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटींपासून तीस लाखांपर्यंत असेल. जगभरातील सर्व खेळाडू ही लीग खेळण्यासाठी उत्सुक असताना चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी यांनी आपले नावही नोंदवले नाही.
पुजारा व विहारी हे भारताच्या कसोटी संघाचे प्रमुख खेळाडू तसेच ते टी20 क्रिकेटही अत्यंत मर्यादित स्वरूपात खेळतात. आयपीएलचा विचार केला गेल्यास विहारी 2019 तर पुजारा 2014 नंतर कोणताही आयपीएल सामना खेळला नाही.
या दोघांच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केल्यास पुजारा हा आयपीएलचे 30 सामने खेळला असून, त्याने 20.52 च्या सरासरीने 390 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षाही कमी राहिलेला. 2021 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा सदस्य होता. मात्र, त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. दुसरीकडे, विहारीची आयपीएल कारकीर्दही फारशी मोठी राहिली नाही. त्याने आयपीएलमध्ये 24 सामने खेळताना 88 च्या सरासरीने 284 धावा केल्या होत्या. यानंतर आयपीएल लिलावात नाव देऊन दुर्लक्ष केले जात असल्याने, त्यांनी यावेळी आयपीएल लिलावासाठी नाव नोंदणी केली नाही.
(Cheteshwar Pujara And Hanuma Vihari Not Registered For IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही तर चीटिंग’, पाकिस्तान- इंग्लंड सामन्यातील टीव्ही पंचांच्या ‘त्या’ निर्णयाने वादाला फुटले तोंड
महत्त्वाच्या संघाची घोषणा! अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी, तर सूर्याही ताफ्यात सामील