---Advertisement---

भारताची भक्कम भिंत…! पाय मुरगळला, तरीही पट्टी बांधून ‘लढवय्या पुजारा’चे अर्धशतक- Video

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 10:29 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गेल्या ३ दिवसांपासून लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या आपल्या दुसऱ्या डावात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. सलामीवीर केएल राहुल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आला. मागील सामन्यातील लय कायम राखत पुजाराने या सामन्यातही अर्धशतकी योगदान दिले. दरम्यान त्याचा पाय मुरगळला असतानाही वेदनांकडे दुर्लक्ष करुन तो मैदानावर टिकून राहिला.

ही घटना ४५ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर घडली. क्रेग ओव्हरटनच्या षटकात धाव घेताना त्याचा पाय अचानक मुरगळला. त्यानंतर तो खूप वेदनांनी विव्हळतांना दिसला. यानंतर पुजारा जमिनीवर झोपला आणि फिजिओने त्याच्या पायाची पाहणी केली. फिजिओने तपासल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी सज्ज झाला. पायाला पट्टी बांधून त्याने चिवट झुंज दिली. सलामीवीर रोहितला साथ देत स्वतचे अर्धशतकही पूर्ण केले. अखेर रोहितची विकेट गेल्यानंतर त्याच षटकात ऑलि रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर मोईन अलीच्या हाती चेंडू देत ६१ धावांवर तो झेलबाद झाला.

मात्र पुजारा अन् रोहितच्या धमाकेदार भागिदारीमुळे भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाकेर ३ विकेट गमावून २७० धावा केल्या आहेत. विराट कोहली २२ तर रवींद्र जडेजा ९ धावांवर खेळत आहेत.

भारताकडे सध्या १७१ धावांची आघाडी आहे. केएल राहुल आणि रोहित शर्माने दुसऱ्या डावात भक्कम सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी झाली होती. ही जोडी इंग्लंडचा वेगावन गोलंदाज जेम्स अँडरसनने मोडली. जेम्स अँडरसनने ३४ व्या षटकात केएल राहुलला ४६ धावांवर बाद केले. रोहित शर्माने १२७ धावांची जबरदस्त खेळी केली. पुजारानेही ६१ धावा करत मोलाची साथ दिली.

तत्पुर्वी, ओव्हल कसोटीत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नव्हती. भारताचे प्रमुख फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले होते. केवळ विराटने अर्धशतकीय खेळी करत थोडीफार झुंज दिली होती. शार्दुल ठाकूरने मात्र, आक्रमक फलंदाजी करत ५७ धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्यामुळे सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता. भारतीय संघाच्या प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर सर्वबाद झाला आहे. यासह इंग्लंडने भारतीय संघावर दुसऱ्या डावात ९९ धावांची आघाडीही घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

कडक षटकार अन् शतकाला गवसणी, रोहितच्या क्लास सेंचूरीनंतर पत्नीची ‘फ्लाइंग किस’; व्हिडिओ व्हायरल

सुरुवातीलाच गेला असता, पण बर्न्समुळे रोहितला दोनदा जीवनदान; इंग्लिश दिग्गजानेच घेतली फिरकी

षटकार अन् हिटमॅन, एक अनोखंच नातं! कारकिर्दीतील ‘हे’ ४ महत्त्वाचे टप्पे गाठताना रोहितने चेंडू केलाय सीमापार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---