जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगतदार अवस्थेत आला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 444 धावांचा पाठलाग करताना अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी 280 धावा आवश्यक आहेत. या सामन्यात सर्वच फलंदाजांकडून भारतीय संघाला योगदानाची अपेक्षा होती. टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारा याच्याकडून भारतीय संघर्ष अपेक्षित करत होता. मात्र, एक खराब फटका खेळून त्याने आपला बळी गमावला. मागील अनेक वर्षांपासून काउंटी क्रिकेट खेळत असूनही, त्याचा हा अनुभव इथे कामी आलेला नाही.
जागतिक कसोटी अजिंक्यपच स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी भारतीय संघाला 444 धावांचे आव्हान मिळाले. त्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी 41 धावांची सलामी दिली. त्यानंतर पुजारा व रोहित शर्मा यांनी 51 धावा जोडल्या. रोहित बाद झाल्यानंतर काही चेंडूच्या अंतरानेच पुजाराने अपर कट खेळताना आपला बळी गमावला. त्याने 27 धावा केल्या.
पुजारा मागील 7 वर्षांपासून काउंटी क्रिकेट खेळत आहे. याआधी त्यांनी यॉर्कशायर, नॉटिंगहॅमशायर व ग्लोसेस्टरशायरसाठी काउंटी क्रिकेट खेळले आहे. तसेच, मागील दोन वर्षांपासून तो ससेक्स काउंटी संघाचा कर्णधार ही आहे. मात्र, त्याचा हा अनुभव भारतीय संघाच्या दोन जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धांच्या अंतिम सामन्यात कामी आला नाही.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021 अंतिम सामन्यात न्युझीलँड विरुद्ध पहिल्या डावात आठ व दुसऱ्या डावात 15 अशी कामगिरी त्याला करता आलेली. त्यानंतर आता यावेळी देखील तो 30 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. पहिल्या डावात त्याने 14 धावा केल्या होत्या. या दोन अंतिम सामन्यात मिळून त्याच्या बॅटमधून केवळ 64 धावा आल्या आहेत.
(Cheteshwar Pujara County Experience Not Worthy For India In Two WTC Final)
महत्वाच्या बातम्या –
कसोटीत पाचव्या दिवसाचा बॉस आहे कोहली! ‘ही’ आकडेवारी उंचावतेय चाहत्यांच्या अपेक्षा
सचिननंतर विराटच! WTC फायनलचा मौका साधून ‘किंग कोहली’ने केला महापराक्रम