बांगलादेश विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारताकडून एकाही खेळाडूने शतक ठोकले नव्हते. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन भारतीय खेळाडूंनी शानदार शतक साजरे केले. तसेच, एकूण आघाडी पाचशे धावांच्या पुढे गेल्यानंतर दुसरा डाव घोषित केला.
चेतेश्वर पुजाराचे शतक
या सामन्यात पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 90 धावांवर बाद झाला होता. यावेळी तो शतक करण्यापासून हुकला. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पुजाराने शानदार शतक साजरे केले. त्याने 130 चेंडूत 102 धावा करत शतक झळकावले. यामध्ये 13 चौकारांचा समावेश होता. त्याचे हे शतक तब्बल 1443 दिवसांनंतर आले. विशेष म्हणजे, हे त्याचे कारकीर्दीतील सर्वात वेगवान शतक होते.
What a hundred from Pujara 🤩#BANvIND | #WTC23 | 📝 https://t.co/ym1utFYZ5S pic.twitter.com/g0tOCz6Z3C
— ICC (@ICC) December 16, 2022
शुबमन गिलचे शतक
पुजारापूर्वी सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) यानेही शानदार शतक झळकावले. त्याने 147 चेंडूत 103 धावा चोपत आपले शतक साकारले. हे त्याचे कसोटीतील पहिलेच शतक होते. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 10 चौकारांचीही बरसात केली होती.
भारताने डाव केला घोषित
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने पहिल्या डावात पुजारा (90), श्रेयस अय्यर (86), आर अश्विन (58) आणि कुलदीप यादव (40) यांच्या मदतीने 404 धावांचा डोंगर उभा केला होता. हे आव्हान पार करताना बांगलादेश संघाचा डाव 150 धावांवरच संपुष्टात आला होता. त्यामुळे भारताने 254 धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात पुजाराने 61.4 षटकात आपले शतक साजरे केले. पुजाराच्या शतकानंतर भारतीय संघाने आपला डाव 2 विकेट्स गमावत 258 धावांवर घोषित केला.
India have declared 👀#BANvIND | #WTC23 | 📝 https://t.co/ym1utFYZ5S pic.twitter.com/naTMFxB8vx
— ICC (@ICC) December 16, 2022
भारताकडे पहिल्या डावाची 254 धावांची आघाडी होती. यासह आता भारताने दुसरा डाव 258 धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशपुढे विजयासाठी एकूण 513 धावांचे आव्हान दिले आहे. आता बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 513 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे. (cheteshwar pujara hit century and India have declared 2nd inning)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या वाघाची गर्जना! शुबमनने बांगलादेशविरुद्ध झळकावलं पहिलं वहिलं शतक, षटकार- चौकारांचा पाडला पाऊस
आता काय म्हणायचं यांना! पाकिस्तानी खेळाडूचे आयपीएलबाबत खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘आयपीएलची गुणवत्ता…’