भारताच्या कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये ससेक्स काउंटी संघाकडून खेळतोय. इंग्लंडमध्ये सध्या देशातील प्रमुख वनडे स्पर्धा खेळली जात आहे. ससेक्स संघाचे नेतृत्व करत असलेला पुजारा स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असून त्याने स्पर्धेतील आपले तिसरे शतक झळकावले.
मंगळवारी (२३ ऑगस्ट) मिडलसेक्स व ससेक्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ससेक्सने निर्धारित ५० षटकात ४ बाद ४०० धावा केल्या. ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली.
A century from just 75 balls for @cheteshwar1. 🤩 💯
Just phemeomenal. 💫 pic.twitter.com/z6vrKyqDfp
— Sussex Cricket (@SussexCCC) August 23, 2022
या सामन्यात पुजारा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. आधीपासून तुफान फॉर्ममध्ये असलेल्या पुजाराने आक्रमक सुरुवात केली. त्याने ७५ चेंडूत स्पर्धेतील आपले तिसरे शतक पूर्ण केले. ९० चेंडूवर २० चौकार व दोन षटकारांच्या मदतीने १३२ धावा केल्या. पाचव्या सामन्यातील त्याचे हे तिसरे शतक ठरले. यापूर्वी त्याने १४ ऑगस्ट रोजी सरेविरुद्ध १७४ धावा केल्या होत्या. तर त्याच्या दोन दिवस आधी म्हणजे १२ ऑगस्ट रोजी वॉर्विकशायरविरुद्ध १०७ धावांची खेळी केली होती.
स्पर्धेतील त्याचा आतापर्यंतचा फॉर्म तगडा दिसून आला आहे. त्याने आतापर्यंत आठ सामन्यात १०२.३३ च्या सरासरीने व तीन शतकांच्या मदतीने ६१४ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणारे खेळाडूंच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पुजाराने यावर्षी ससेक्स काउंटी संघासाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाच शतकांच्या मदतीने व १०९.४३ च्या सरासरीने ७६६ धावा केल्या होत्या. अखेरच्या दोन सामन्यात त्याला संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी लाभली होती. त्यानंतर आता या वनडे स्पर्धेतही कर्णधार म्हणून आपले योगदान देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…
‘दीपक हुड्डासोबत प्रॅक्टिस सेशन परवडत नव्हते, तो बॉल थेट…’, प्रशिक्षकांनीच दिले स्पष्टीकरण
मोठी बातमी। सानिया मिर्झाने यूएस ओपनमधून घेतली माघार! पोस्ट करत सांगितले खरे कारण