अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅ़डलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताचा हा आॅस्ट्रेलियातील केवळ ६वा कसोटी विजय आहे. यापुर्वी भारताने २००८मध्ये पर्थ कसोटीत विजय मिळवला होता.
तसेच यावर्षी भारताने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया देशात विजय मिळवला आहे. यापुर्वी १९६८मध्ये अशी कामगिरी संघाकडून झाली होती.
विशेष म्हणजे भारताने यावर्षी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया जे विजय मिळवले आहेत त्या प्रत्येक सामन्यात चेतेश्वर पुजारा या एकमेव खेळाडूने एकातरी डावात ५०पेक्षा अधिक धावा केल्या आहेत .
दक्षिण आफ्रिकेत ज्या सामन्यात संघाने विजय मिळवला त्या सामन्यात पुजाराने जोहान्सबर्गला पहिल्या डावात १७९ चेंडूत ५० धावा केल्या होत्या तर इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रीजला २०८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली होती. आजच्या सामन्यात त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पहिल्या डावात १२३ तर दुसऱ्या डावात ७१ धावांची खेळी केली. या तीन विजयात ५०पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच असा इतिहास घडवण्याची विराट कोहलीच्या टीम इंडियाला संधी
–Video: आॅस्ट्रेलियन चाहत्यांकडून आपमान झाल्यानंतरही विराट कोहलीने दाखवली खिलाडूवृत्ती
–Video: आॅस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आऊट होणार हे या दिग्गजाने आधीच ओळखलं!