भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. रविवारी (19 फेब्रुवारी) म्हणजेच दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवसी सामन्याच्या निकाल लागला. भारताने हा सामना 6 विकेट्स राखून नावावर केला. जडेजाने तिसऱ्या दिवसी एकून सहा विकेट्स घेतल्या आणि पाहुण्या ऑस्ट्रेलियाला स्वस्तात बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 118 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात भारताने चार विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले. चेतेश्वर पुजारा साठी ही सामना खास ठरला. या विजयासह त्याने कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण केले.
भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या डावात 115 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतापेक्षा एक धाव जास्त केली होती आणि दुसऱ्या डावातील 113 धावांच्या जोरावर त्यांना भारताला हे लक्ष्य दिले. सामन्याच्या पहिल्या डावात स्वतःचा 100वा कसोटी सामना खेळणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 0 धावांवर बाद झाला, पण दुसऱ्या डावात त्याने नाबाद 31 धावा कुटल्या आणि भारताचा डाव देखील सांभाळला. पुजारा भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा 13 वा खेळाडू ठरला आहे. स्वतःच्या 100 व्या कसोटीत भारताला विजय मिळवून देणारा पुजारा सहावा खेळाडू ठरला. राहिलेल्या सात भारतीयांपैकी चार खेळाडूंना या सामन्यात पराभव स्वीकारला, तर तीन खेळाडूंच्या कारकिर्दीतीत हा महत्वपूर्ण सामना अनिर्णित राहिला.
भारतीय संघासाठी सुनिल गावसकर पहिले खेळाडू होते, ज्यांनी संघासाठी 100 कसोटी सामने खेळण्याची कामगिरी केली होती. दिलीप वेगसरकर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर, तर कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावरील सचिन तेंडुलकर भारतासाठी सर्वात जास्त 200 कसोटी सामने खेळला आहे. यादीत पुजाराच्या आधी विराट कोहलीचे नाव आहे. विराटने मागच्या वर्षी स्वतःचे 100 कसोटी सामने पूर्ण केले.
‘हे’ खेळाडू भारतासाठी 100वा कसोटी सामना खेळताना काय लागला होता निकाल
सुनिल गावसकर (अनिर्णित)
दिलीप वेगसरकर (पराभव)
कपिल देव (अनिर्णित)
सचिन तेंडुलकर (अनिर्णित)
अनिक कुंबळे (विजयी)
राहुल द्रविड (पराभूत)
वीवीएस लक्ष्मण (विजयी)
सौरव गांगुली (पराभूत)
विरेंद्र सेहवाग (पराभूत)
हरभजन सिंग (विजयी)
ईशांत शर्मा (विजयी)
विराट कोहली (विजयी)
चेतेश्वर पुजारा (विजयी)*
दरम्यान, उभय सामन्यांतील या दिल्ली कसोटीचा एकंदरीत विचार केला, तर पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली. भारताने नाणेफेक गमापल्यानंतर पहिल्यांदाच गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 263, तर दुसऱ्या डावात 113 धावांवर गुंडाळला गेला. तर दुसरीकडे भारताचा पहिला डाव 262 धावांवर संपल्यानंतर दुसऱ्या डावात भारताने 4 बाद 118 धावा करून विजय मिळवला. चार सामन्यांच्या या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारत सध्या 2-0 अशा आघाडीवर आहे. (Cheteshwar Pujara led India to victory in the 100th Test of his career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
किंग कोहलीचा भीम पराक्रम! 25000 धावांचा टप्पा पार करताच मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चाही World Record
बंगालला झुकवत सौराष्ट्रने पटकावली रणजी ट्रॉफी, आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर घ्या जाणून