जुलै महिन्यात होत असलेल्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे व कसोटी संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. कसोटी संघात या दौऱ्यासाठी अनेक बदल केल्याचे दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज असलेला चेतेश्वर पुजारा या संघात जागा बनवू शकला नाही. मात्र, त्याची दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभागाच्या संघात निवड होऊ शकते.
सततच्या खराब कामगिरीमुळे पुजाराला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले. आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभागाच्या संघाची घोषणा लवकरच केली जाईल. या संघात पुजाराला स्थान मिळू शकते. त्याच्यासह सूर्यकुमार यादव याचादेखील या संघात समावेश होण्याची शक्यता आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 28 जून रोजी सुरुवात होईल.
पश्चिम विभागाच्या संघाचे नेतृत्व गुजरातचा प्रियांक पांचाल हा करू शकतो. पुजारा व सूर्यकुमारसह पृथ्वी शॉ हा देखील या संघाचा भाग असेल. मुंबईचा यशस्वी जयस्वाल व महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड या संघाचा भाग असण्याची शक्यता होती. मात्र, या दोघांची वेस्ट इंडीज दौऱ्यावरील कसोटी संघात निवड झाल्याने त्यांचा संघात समावेश केला जाणार नाही. या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकद व अक्षर पटेल हे देखील वेस्ट इंडीज दौऱ्यावर जात असल्याने त्यांचा संघात समावेश होणार नाही. पश्चिम विभाग आपला पहिला सामना 4 जुलैपासून खेळेल.
दुलीप ट्रॉफीमध्ये यावेळी सहा विभागाचे संघ खेळताना दिसतील. यामध्ये पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, उत्तर विभाग, पूर्व विभाग व मध्य विभागासह नॉर्थ ईस्ट हा संघ खेळेल.
(Cheteshwar Pujara Might Be Play In Duleep Trophy For West Zone With Suryakumar Yadav)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा! दिग्गज क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टीम इंडियात दिसतोय भविष्यातील भारतीय संघ! पुढील 5 वर्षाची तयारीच सुरू