---Advertisement---

पुजाराला ‘हा’ गोलंदाज वाटतो सर्वोत्तम! आजवर अनेकदा ठरलाय त्याचाच शिकार

On: रविवार, जानेवारी 22, 2023 5:21 PM
Cheteshwar-Pujara
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हा पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसेल. ऑस्ट्रेलियाला नेहमीच नडणारा पुजारा या मालिकेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. आपल्या संयमी फलंदाजीने जगभरातील गोलंदाजांना नाकीनऊ आणणाऱ्या पुजाराला कोणता गोलंदाज सध्या सर्वोत्तम वाटतो याबाबत त्याने आपले उत्तर दिले आहे.

भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने नुकतीच एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत दिली. यामध्ये तो अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देताना दिसला. सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज कोण आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याचे नाव घेतले.

पुजारा म्हणाला,

“सध्या जगात अनेक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. मात्र, मला ज्याच्याविरुद्ध सर्वाधिक सामना करणे कठीण जाते तो पॅट कमिन्स आहे.”

कमिन्स हा जागतिक कसोटी गोलंदाजी क्रमवारीत मागील दोन वर्षापासून अव्वलस्थानी आहे. पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल. कमिन्स व पुजारा यांचा आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 17 वेळा आमना-सामना झाला आहे. यामध्ये कमिन्स पुजाराला 7 वेळा बाद करण्यात यशस्वी ठरला. आगामी मालिकेत तो पुन्हा एकदा पुजारावर वर्चस्व गाजवतो का? हे पाहणे रंजक ठरणार आहे. सध्या पुजारा रणजी ट्रॉफी 2022-2023 मध्ये सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतोय.

चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे सुरू होईल. त्यानंतर उर्वरित तीन सामने अनुक्रमे दिल्ली, धर्मशाला व अहमदाबाद येथे होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.

(Cheteshwar Pujara Named Pat Cummins As Best Bowler In World Cricket Right Now)

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्टंप्स मागे सोडून स्टीव स्मिथने मारला अनोखा शॉट, चेंडू टाकण्याआधी बॉलरही गोंधळला
केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही चढणार बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे अष्टपैलूची होणारी पत्नी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---