---Advertisement---

स्टंप्स मागे सोडून स्टीव स्मिथने मारला अनोखा शॉट, चेंडू टाकण्याआधी बॉलरही गोंधळला

Steve Smith
---Advertisement---

सिडनी सिक्सर्स संघाचा फलंदाज स्टीव स्मिथ याने बिग बॅश लीगमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले. स्मिथने शनिवारी (21 जानेवारी) बीबीएलमध्ये सगल दुसरे शतक ठोकले. स्मिथने गुरुवारी (19 जानेवारी) एडिलेड स्ट्रायकर्सविरुद्ध खेळताना 56 चेंडूत शतक ठोकले, तर शनिवारी सिडनी थंडर्स संघाविरुद्ध 66 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या. सिडनी थंडर्सविरुद्धच्या सामन्यात स्मिथच्या खेळीसाठी त्याचे कौतुक होत आहेच, पण त्याने लाईव्ह सामन्यात एक असा शॉट खेळला ज्याची विशेष चर्चा होताना दिसते.

शनिवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर्स (Sydney Sixers vs Sydney Thunder) संघ आमने सामने होते. स्मिथ प्रतिनिधित्व करत असलेल्या सिडनी सिक्सर्सने हा सामना 125 धावांच्या अंतराने नावावर केला. या विजयात स्टीव स्मिथ (Steve Smith) याचे योगदान सर्वात मोठे राहिला. स्मिथने केलेल्या नाबाद 125 धावांसाठी त्याला सामना संपल्यानंतर सामनावीर पुरस्कार देखील दिला गेला. त्याच्या या खेलीत 5 चौकार तर 9 षटकारांचा समावेश होता. स्मिथने या वादळी खेळीदरम्यान एकापेक्षा एक शॉट्स खेळले. पण यातील एक शॉट सर्वात जास्त चर्चेत राहिला. स्मिथ हा शॉट पाहून चाहत्यांना हसू रोखणे कठीण झाले आहे.

स्मिथ यापूर्वी फलंदाजी करताना काही मजेशीर एक्शन करताना दिसला आहे. अनेकदा फलंदाजी करताना स्मिथने गोलंदाजांना आश्चर्यचकीत केले आहे. बीबीएलच्या 50 व्या सामन्यात देखील स्मिथने असेच काहीसे केले. त्याने या सामन्यात फलंदाजी करताना स्टंप सोडून पुढच्या बाजूला गेला आणि चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्मिथच्या बॅठवर व्यवस्थित बनला असता, तर नक्कीच षटकार जाऊ शकत होता. पण चेंडू बॅटच्या एका कोपऱ्यावर लागल्याने जास्त लांब गेला नाही. असे असले तरी, स्मिथने यावेळी गोलंदाजाची मात्र चांगलीच अडचण केल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Drink_Cricket/status/1617027992303304704?s=20&t=MZiL1Q_0O686XmOg5owRPw

दरम्यान, स्मिथ या सामन्यातील प्रदर्शनानंतर सलग दोन टी-20 डावांमध्ये शतक करणारा 10 वा फलंदाज ठरला आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी डेविड वॉर्नर, उन्मुक्त चंद, ल्युक राईट, मायकल कलिंगर, केविन पीटरसन, मार्को मारिस, रीजा हेड्रिक्स, ईशान किशन आणि शिखर धवन. उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर पावसामुळे हा सामना 19 षटकांचा खेळला गेला. सिडनी सिकसर्सने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकांमध्ये 2 विकेट्सच्या नुकसानावर 187 धावा केल्या. प्रत्युत्तार सिडनी थंडर्स संघ 14.4 षटकांमध्ये 62 धावा करून सर्वबाद झाला. (Steve Smith played a unique shot in the match against Sydney Thunders)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही चढणार बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे अष्टपैलूची होणारी पत्नी
‘माझा बायोपिक बनवला तर केस ठोकेल…’, शोएब अख्तरकडून निर्मात्यांना चेतावणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---