---Advertisement---

चेतेश्वर पुजारानं सांगितलं भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप कामगिरीमागचं कारण, म्हणाला…

---Advertisement---

सध्या जारी बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पर्थ कसोटीचा दुसरा डाव वगळता भारतीय फलंदाजी प्रत्येक प्रसंगी फ्लॉप ठरली आहे. ॲडलेड कसोटीबद्दल बोलायचं झालं तर, टीम इंडिया पहिल्या डावात केवळ 180 धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर दुसऱ्या डावातही परिस्थिती सुधारली नाही. भारतानं दुसऱ्या डावात 128 धावांवर 5 विकेट गमावल्या असून संघ ऑस्ट्रेलियापेक्षा अजूनही 29 धावांनी मागे आहे. भारताच्या या फ्लॉप बॅटिंग शोवर दिग्गज चेतेश्वर पुजारानं एक मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाच्या अपयशाचं कारण काय? हे पुजारानं स्पष्ट केलं.

चेतेश्वर पुजारानं भारताच्या आक्रमक फलंदाजीला संघाच्या फ्लॉप शोचं कारण म्हटलं आहे. तो म्हणाला, “संघाच्या बैठकीत नक्कीच काही चर्चा झाली होती, जिथे संघाला सकारात्मक पद्धतीनं खेळण्यास सांगितलं गेलं होतं. पर्थ कसोटीत आपण नव्या चेंडूविरुद्ध सावधपणे खेळलो होते. मात्र आता भारत पहिल्या 15-20 षटकांमध्ये बरेच शॉट मारण्याचा प्रयत्न करत आहे.” चेतेश्वर पुजारा पुढे म्हणाला की, “कधीकधी तुम्हाला गोलंदाजांवर दबाव टाकावा लागतो. तुम्हाला परिस्थितीचा आदर करावा लागेल. विशेषत: तेव्हा, जेव्हा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळत आहे.”

चेतेश्वर पुजाराला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. या ट्रॉफीच्या इतिहासात त्यानं 24 सामन्यांत 2,033 धावा केल्या आहेत. भारतीय खेळाडूंना सल्ला देताना तो म्हणाला, “भारताची गोलंदाजी चांगली होती, पण संघाला फलंदाजी करताना काळजी घ्यावी लागेल. फलंदाजांनी बचावात आत्मविश्वास दाखवला पाहिजे. मला वाटतं की सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आमच्याकडे गुलाबी चेंडून खेळण्याचा फारसा अनुभव नाही. याशिवाय आपण जास्त दिवस-रात्र कसोटी सामनेही खेळलेलो नाही.”

हेही वाचा – 

बाप तसा लेक! वीरेंद्र सेहवागच्या धाकट्या मुलाचा गोलंदाजीत कहर
इंग्लंड क्रिकेटमध्ये भूकंप! ईसीबीच्या या निर्णयाविरोधात खेळाडू बंड करण्याचा तयारीत
रिषभ पंत कसोटीतही आयपीएल प्रमाणे फलंदाजी करतो! विचित्र शॉट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---