भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि उभय संघातील कसोटी मालिका बुधवारी (14 डिसेंबर) सुरू झाली. या पहिल्या कसोटी सामन्याच्या भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 6 बाद 278 धावा केल्या. पहिल्या दिवशी भारतासाठी चेतेश्वर पुजारा याने सर्वाधिक 90 धावा केल्या. मात्र, त्याला आपल्या शतकासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
भारतीय संघाचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) या सामन्यात संघात पुनरागमन केले. त्याने पहिल्या दिवशी 203 चेंडूत 90 धावांची खेळी केली. यादरम्यान 11 चौकार मारले. पुजारा या सामन्यात तो शतक पूर्ण करेल अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, तो पुन्हा एकदा नर्व्हस नाईंन्टीजचा शिकार ठरला.
एकवेळ भारताचा सर्वात प्रमुख कसोटी फलंदाज असलेला पुजारा मागील जवळपास चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय शतक झळका होऊ शकला नाही. पुजाराने आंतरराष्ट्रीय शतक झळकावून तब्बल 47 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्याने 2018-2019 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3 जानेवारी 2019 रोजी हे शतक पूर्ण केलेले. सिडनी येथे झालेल्या या सामन्यात त्याने 193 धावांची शानदार खेळी केलेली. मात्र, त्यानंतर झालेल्या 51 डावांमध्ये तो शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे.
पुजाराला 2022 च्या सुरुवातीला भारतीय संघातून वगळण्यात आलेले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याने इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा मार्ग स्वीकारला. त्याने काऊंटी तसेच वनडे सामन्यांमध्ये बहारदार कामगिरी करत इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटीत संघात जागा बनवली. त्यानंतर त्याने आता बांगलादेशविरुद्ध ही खेळी करत संघातील आपले स्थान मजबूत केले आहे.
(Cheteshwar Pujara Out In Nervous 90s Four Years Century Drought Continues)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नशीब असावं तर असं! क्लिन बोल्ड होऊनही बाद झाला नाही श्रेयस अय्यर, पाहा व्हिडीओ
शेवटच्या वेळी जेव्हा केएल राहुल भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार झालेला, तेव्हा निकाल काय होता?