सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील दुसरा सामना ॲडलेडच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला भारतीय संघ 180 धावात सर्वबाद झाला. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) भारताच्या 6 फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामध्ये स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांचा समावेश होता.
दरम्यान आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) स्टार्कच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. स्टार्कने विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुलला (KL Rahul) बाद करण्यासाठी शानदार सेटअप केल्यावर त्याने खासकरून त्या दोन विकेट्सचे कौतुक केले.
एका शोमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान चेतेश्वर पुजारा मिचेल स्टार्कचे कौतुक करत म्हणाला, “त्याची लाईन आणि लेन्थ देखील खूप उत्कृष्ट होती. त्याचा स्विंग खूप चांगला आहे, पण जेव्हा तुम्ही स्टंपवर गोलंदाजी करता तेव्हाच स्विंग घातक ठरतो. त्याने पूर्ण गोलंदाजी केली. तसेच लांबीची गोलंदाजी केली. पण त्याने स्टंपची लाईन सोडली नाही.”
पुढे बोलताना चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) म्हणाला, “जेव्हा चेंडू जुना झाला, तेव्हा विराट कोहली आणि केएल राहुलचा सेटअप खूप चांगला होता. पण स्टार्कच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की तो कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे, विशेषत: भारताविरूद्ध. भारताविरूद्ध 5 विकेट्स मिळवून, त्याने शानदार गोलंदाजी केली आणि त्याची लांबी बदलणे देखील उत्कृष्ट होते.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; स्लेजिंग मूडमध्ये विराट कोहली, ऑस्ट्रेलिया फलंदाजांना केले तंग
मोहम्मद सिराजने मोडला शोएब अख्तरचा वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम?
IND vs AUS; “रोहितचा पुढचा पाय अडकला…” ऑस्ट्रेलिया दिग्गजाने रोहितच्या जखमेवर चोळले मीठ






