भारतीय कसोटी संघाची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत ससेक्सकडून खेळताना सलग दुसरे शतक ठोकले आहे. त्याने केलेले पहिले शतक जरी वाया गेले असले तरी त्याचे दुसरे शतक सामना विजयी ठरले. त्याने एकूण १७४ धावा केल्या. त्याची ही खेळी इंग्लंडच्या प्रथम श्रेणीमध्ये एका एशियाई खेळाडूने केलेली सर्वोच्च खेळी ठरली आहे. त्याच्या या तुफानी खेळीनेच नाहीतर त्याच्या मुलीच्या रिऍक्शननेही नेटकऱ्यांचे हृद्य जिंकले आहे.
सामन्यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये सामन्यातील काही क्षण आहेतच त्याचबरोबर त्याच्या मुलीची क्यूट रिऍक्शनदेखील कैद झाली झाली आहे. त्यामध्ये ती नाचताना आणि तिच्या वडिलांना चीयर करताना दिसत आहे.
‘संघाच्या विजयात थोडेफार योगदान दिल्याने आनंद वाटत आहे. संपूर्ण संघाने उत्कृष्ठ खेळ केला. आम्ही पुढच्या टप्प्यात पोहोचलो आहोत’, असे कॅप्शन देत पुजाराने इंस्टाग्राम पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
सरे विरुद्धच्या या सामन्यात ससेक्सने अवघ्या ९ धावांतच दोन्ही सलामीवीर गमावले. यावेळी पुजारा आणि टॉम क्लार्क यांनी तिसऱ्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी केली. क्लार्कने १०६ चेंडूत १०४ धावा केल्या. तर पुजाराने १३१ चेंडूत १७४ धावा केल्या. यामध्ये त्याने २० चौकार आणि ५ षटकार फटकारले. ३७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सरेकडून रेयान पटेल आणि टॉम लॉज यांनीच चांगली खेळी केली होती. त्यांनी अनुक्रमे ६५ आणि नाबाद ५७ धावा केल्या होत्या. मात्र यादोघांशिवाय कोणीही खेळाडू खेळपट्टीवर अधिक वेळ टिकला नाही. सरेने ३१.४ षटकात सर्वबाद १६२ धावा केल्या. यामुळे हा सामना ससेक्सने २१६ धावांनी जिंकला.
पुजाराने या सामन्यात ससेक्सचे नेतृत्व केले आहे. तसेच त्याने यावर्षी ससेक्स काउंटी संघासाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पाच शतकांच्या मदतीने व १०९.४३ च्या सरासरीने ७६६ धावा केल्या होत्या. अखेरच्या दोन सामन्यात त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील लाभली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
का ‘कॅप्टनकूल’ने निवृत्तीसाठी निवडली होती ७.२९ ही वेळ? घ्या जाणून कारण
वॉर्नरचं भारतप्रेम हृदयास भिडणारं! भारताच्या स्वातंत्र्यदिनी फोटो शेअर करत दिल्या हटके शुभेच्छा
केएल राहुलमुळे विंडीजच्या दौऱ्यात भन्नाट कामगिरी करण्याऱ्या खेळाडूचा फलंदाजी क्रम धोक्यात!