भारताचा अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने इंग्लंडच्या काउंटी चँपियनशीपमध्ये ससेक्स संघाकडून खेळताना सलग तिसऱ्या सामन्यात शतक ठोकले आहे. संघाकडून पदार्पण करताना दमदार दुहेरी शतक ठोकले होते. परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. तो सामना अनिर्णीत राहिला होता. यानंतर आता दुसऱ्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली, परंतु संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. यानंतर पुन्हा सलग तिसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून शतक निघाले आहे.
डरहम विरुद्ध ससेक्स (Durham Vs Sussex) यांच्यात २८ एप्रिलपासून सामना खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डरहमने २२३ धावा केल्या होत्या. डरहमच्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुजाराने (Cheteshwar Pujara Consecutive Third Century) शतक ठोकले. १९८ चेंडू खेळताना त्याने नाबाद १२८ धावा फटकावल्या. आपल्या या खेळीदरम्यान त्याने १६ चौकारही मारले.
त्याच्या या शतकी योगदानामुळे ससेक्सने दुसऱ्या दिवसाखेर ५ बाद ३६२ धावा धावफलकावर लावल्या आहेत. सध्या ससेक्स संघ सामन्यात डरहमपेक्षा १३९ धावांनी आघाडीवर आहे.
https://twitter.com/SussexCCC/status/1520062961053745152?s=20&t=a7devHhacu2b31HDNL18oQ
चेतेश्वर पुजाराचे सलग तिसरे शतक
पुजाराचे हे काउंटी चँपियनशीपमधील ५ डावांमध्ये आलेले तिसरे शतक आहे. यापूर्वी डर्बीशायरविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात केवळ ६ धावा केलेला पुजारा दुसऱ्या डावात चांगलाच फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने नाबाद २०१ धावांची खेळी केली होती. पुजाराच्या बॅटमधून तब्बल २७ महिन्यांनंतर हे शतक आले होते.
त्यानंतर वॉर्सेस्टशायरविरुद्ध दुसरा सामना खेळताना त्याने पुन्हा शतकी तडाका लावला होता. या सामन्यात त्याने २०६ चेंडूंचा सामना करताना १०९ धावा (Cheteshwar Pujara Century) फटकावल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने १६ चौकारही मारले होते. खराब फॉर्ममूळे पुजाराला भारतीय कसोटी संघातील आपली जागा गमवावी लागली आहे. मात्र आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये शानदार लयीत दिसत असलेल्या पुजाराला भारतीय कसोटी संघातील त्याचे स्थान परत मिळू शकते. तो इंग्लंड दौऱ्यावरील पाचव्या कसोटी सामन्यातून संघात पुनरागमन करू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्यांचा’ स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही, परंतु रोहितला मात्र त्यांनी घडवले
मैत्रीत पुन्हा पडली असती फूट! दीपक हुडामुळे कृणाल पंड्याचं लाईव्ह सामन्यात फिरलं डोकं
लखनऊने पंजाबला चारली धूळ, तरीही नाखुश आहे कर्णधार केएल राहुल; सांगितल्या चुका






