भारतीय संघ या महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल. कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने हा दौरा फार महत्त्वाचा आहे. कारण या दौऱ्यादरम्यान आयसीसीच्या पहिल्या-वहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणार आहे. त्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात भारतीय संघासाठी चेतेश्वर पुजाराची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, पुजाराने या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्नीसमवेत वेळ घालवतानाचा एक प्रेमळ फोटो शेअर केला आहे, ज्यावर चाहत्यांच्या खुप प्रतिक्रिया आल्या आहेत.
चेतेश्वर पुजाराने आपल्या पत्नीसमवेतचे एक जुने छायाचित्र शेअर केले आहे, यात दोघे एकत्र बसून कॉफी पीताना दिसत आहेत. पुजाराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “चांगली कॉफी आणि चांगली मैत्री, खरोखर आनंद देते.”
https://www.instagram.com/p/CPiWUGrDqux/
पुजाराच्या या पोस्टला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असून अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने तर “यावेळी 200 मार”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी त्याला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पुजारा सध्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने मुंबईत तयार केलेल्या बायोबबलमध्ये उपस्थित आहे. बायोबबलमध्ये त्याची पत्नी पूजा आणि मुलगी आदिती देखील हजर आहेत. इंग्लंड दौर्यावर कुटूंबाला नेण्यास क्रिकेटपटूंना परवानगी दिली आहे.
या इंग्लंड दौऱ्यात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्पटन येथे रंगणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड संघात ५ कसोटी सामने खेळवले जातील. या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली असून पुजाराचा भारतीय संघात समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कमीतकमी २ षटकार मारत सर्वाधिक आयपीएल डाव खेळणारे फलंदाज, यादीत भारतीयांचा बोलबाला
‘तो’ म्हणाला होता, ‘माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल’; २ वर्षांनी बरोबर तसेच घडले
‘कॅप्टनकूल’ धोनीच्या तालमीत तयार झालेत ‘हे’ वस्ताद, आज आहेत विविध संघांचे प्रशिक्षक