fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल; २ वर्षांनी बरोबर तसेच घडले

Hansie Cronje Death In Plane Crash After 2 Years Of Match Fixing

मॅच फिक्सिंग… ही अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये बुकी खेळाडूंना पैशाचे लोभ दाखवून सामना मुद्दाम पराभूत करण्यास प्रवृत्त करतात किंवा सामन्याचा निकाल वेगळा लागवा म्हणून प्रयत्न करतात. यामुळे ते स्वत: तर फसतातच आणि त्या खेळाडूच्याही कारकिर्दीचाही नाश करुन टाकतात.

दक्षिण आफ्रिकेचे एक माजी कर्णधारही मॅच फिक्सिंगचा शिकार झाले होते. त्यांनी आपल्या अपराधाची कबुलीही दिली होती. पण त्याच्या बरोबर २ वर्षांनंतर एका विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. विशेष म्हणजे, ही घटना कालच्या दिवशी म्हणजे १ जून २००२ मध्ये घडली होती.  Hansie Cronje Death In Plane Crash After 2 Years Of Match Fixing

‘हॅन्सी क्रोनिये’ असे त्या कर्णधाराचे नाव होते. १८ वर्षांपुर्वी एअर क्वारिसच्या एका कार्गो फ्लाइटचा आउटेंकिया पर्वत रांगामध्ये टक्कर होऊन अपघात झाला होता. या फ्लाइटमध्ये हॅन्सीदेखील होते. विमानाच्या दोन्ही पायलट्सचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

एका वेळेला हॅन्सी दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधार म्हणून नावारुपाला आले होते. दरम्यान १९९६मध्ये दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी दोन्ही संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात जर इंग्लंडचे खेळाडू बाद झाले आणि भारताने तो सामना जिंकला तर हॅन्सी यांना ३० हजार डॉलर मिळणार होते. मात्र, या गोष्टीचा तपास लागल्याने हॅन्सी यांनी स्वत: २०००मध्ये किंग्स कमीशनपुढे या गोष्टीची कबुली दिली होती.

किंग्स कमीशनच्या जज एरविन किंग यांच्या अध्यक्षीय समितीपुढे हॅन्सी म्हणाले होते की, “त्यांनी पैशासाठी मॅच फिक्सिंग केली होती. त्यांनी १९९६ ते २००० दरम्यान बेकायदेशीर सट्टेबाजांकडून कमीत कमी १३०००० डॉलर घेतले होते. याबरोबरच सट्टेबाज मार्लोन अरोनस्टम यांनी हॅन्सीला महागडा लेदर जॅकेट भेट म्हणून दिला होता.” पुढे पूर्ण तपासणी करण्यात आल्यानंतर उघडकीस आले होते की, हॅन्सी यांचे कॅमेन बेटावरील एका बँकेत कमीत कमी ७२ खाते होते. त्यामुळे हॅन्सीवर आजीवन बंदी घालण्यात आली होती.

हॅन्सीला त्यांच्या कृत्याचा खूप पश्चाताप होत होता. हॅन्सीचे मोठे भाऊ फ्रांस यांनी एका टिव्ही चॅनलच्या मुलाखतीत सांगितले होते की, “हॅन्सीने त्याच्या मृत्यूच्या एक दशकपुर्वी मला म्हटले होते की, आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी सलग प्रवास करत असतो. कधी बसने तर कधी विमानाने हा प्रवास केला जातो. आता मला वाटत आहे की, माझा मृत्यू एका विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल.”

हॅन्सी यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत ६८ कसोटी सामन्यात ३७१४ धावा केल्या होत्या. तर १८८ वनडे सामन्यात ५५६५ धावा केल्या होत्या. तसेच ५३ कसोटी सामन्यात त्यांनी संघाचे नेतृत्वही केले होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

अतिशय कमी कसोटी खेळलेल्या रोहित शर्माच्या नावावर आहे एक…

टीम इंडियाच्या ‘लाडक्या’ गोलंदाजाचे कसोटीतील कमबॅक झाले कठीण, कारण…

श्रीलंका संघ मैदानात उतरणार, आशियातील हा पहिला संघ करणार ‘या’ मोठ्या…

You might also like