भारत आणि इंग्लंड संघातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गेल्यावर्षी कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आला होता. याच सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यातून भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा पुनरागमनासाठी सज्ज आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असल्याचे वक्तव्य चेतेश्वर पुजाराने एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.
‘इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे. अलीकडेच काउंटी सामन्यांदरम्यान खेळपट्टीवर वेळ घालवल्याचा फायदा मला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मिळेल. शिवाय नेहमीप्रमाणे मी दौऱ्यापूर्वी चांगली तयारी आणि प्रशिक्षणासाठी उत्सुक आहे’, असेही पुजारा म्हणाला.
मागच्या वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चार सामने खेळले गेले. परंतु शेवटचा निर्णायक कसोटी सामना कोरोनाच्या नियमांमुळे पुर्ण होऊ शकला नाही. संघांच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारतीय संघ मायदेशात परतला होता. आता हा राहिलेला एकमात्र कसोटी सामना यावर्षी पुन्हा आयोजित केला गेला आहे. १ जुलै रोजी हा सामना बर्मिंघममध्ये सुरू होईल.
दरम्यान, या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडे सध्ये २-१ अशी बढत आहे. त्यामुळे भारतीय संघाला आणखी एक कसोटी मालिका खिशात घालण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. उर्वरित एका सामन्यासाठी रोहित शर्माच्या कर्णधारपदात भारतीय संघाची नियुक्ती करण्यात आली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धवनचा ‘गब्बर’ विक्रम, आयपीएलमध्ये असा किर्तीमान करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज
पंजाबचा ‘उडता’ लिव्हिंगस्टोन! बाउंड्री लाईनवर हवेत झेपावत अष्टपैलूने घेतला जबरदस्त झेल
‘क्रिकेट इथेच संपत नाही, मला फॉर्ममध्ये येण्यासाठी…’ आयपीएलमधील खराब कामगिरीबद्दल रोहितचे मोठे भाष्य