आयपीएलमध्ये अनेकदा उद्भूत क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळत असतो. फलंदाजी, गोलंदाजी सोबतचं क्षेत्ररक्षणामुळे सामन्यांचा निर्णय लागल्याचेही अनेकदा जाणवते. असंच काहीसं घडलं पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद दरम्यान झालेल्या आयपीएल २०२२ च्या अखेरच्या साखळी सामन्यात.
सनरायजर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) जोरदार फॉर्ममध्ये खेळत होता. सामन्याच्या ११व्या षटकांत गोलंदाज अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) चेंडूवर अभिषेकने एक जोरदार फटका लगावला. अभिषेक त्यावेळी ४३ धावा बनवून खेळत होता. त्यावेळी बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या लिएम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) हवेत झेप घेत एक उत्कृष्ट झेल घेतला. सामना संपल्यानंतर लिव्हिंगस्टचा हा झेल सोशल मिडीयावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Brilliant @liaml4893 ❤️❤️❤️???????????? pic.twitter.com/nDdPRH9vsn
— Rushikesh Pathak (@RushiGooner) May 22, 2022
Sunning Catch by Liam Livingston https://t.co/6Tq6wMOkDi
— Vanson Soral (@VansonSoral) May 22, 2022
हा सामना सुरू होण्यापूर्वीच आयपीएल प्ले-ऑफची स्पर्धा संपुष्टात आली होती. तरी मात्र, लिव्हिंगस्टनच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे सामन्याची रंगत टिकून राहिली. हैदराबादने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणायाचा निर्णय घेतला होता. कर्णधार विलियम्सन अनुपस्थित असल्याने हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर होती.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १५७ धावा बनवल्या. त्यानंतर पंजाबने लिव्हिंगस्टनच्या २२ चेंडूत नाबाद ४९ धावांच्या मदतीने १५.१ षटकांत लक्ष्य पूर्ण केलं आणि आयपीएल २०२२ च्या हंगामाची शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. या सामन्यानंतर पंजाब गुणतालिकेत ६ व्या क्रमांकावर आणि हैदराबाद ८ व्या क्रमांकावर राहिले.
दरम्यान, आयपीएल २०२२ मध्ये अनेक धमाकेदार झेल पहायला मिळाले. त्यामध्ये प्रामुख्याने विराट कोहली, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, लिएम लिव्हिंगस्टोन यांच्यासह रियान पराग सारख्या अनेक नवोदितांचा देखील समावेश आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी सह क्षेत्ररक्षणही महत्त्वाचे आहे हे आता ठळकपणे दिसून येत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘क्रिकेट इथेच संपत नाही, मला फॉर्ममध्ये येण्यासाठी…’ आयपीएलमधील खराब कामगिरीबद्दल रोहितचे मोठे भाष्य
बापरे! उमरान मलिकचा वेगवान चेंडू आदळला थेट मयंकच्या बरगड्यांवर, सामनाही थांबला